मीरा भाईंदर महापौर मॅरेथॉनमध्ये परदेशी स्पर्धकांचं वर्चस्व

| Updated on: Aug 18, 2019 | 4:10 PM

मीरा भाईंदर महापौर मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या 21 किलोमीटर गटात रंजित कुमार पटेल याने प्रथम क्रमांक पटकावला, तर महिलांमध्ये हॅना गठर्ड हिने बाजी मारली.

मीरा भाईंदर महापौर मॅरेथॉनमध्ये परदेशी स्पर्धकांचं वर्चस्व
Follow us on

मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महापौर मॅरेथॉनमध्ये (Mira Bhainder Mayor Marathon) पुरुषांच्या 21 किलोमीटर गटात रंजित कुमार पटेल याने प्रथम क्रमांक पटकावला, तर महिलांमध्ये हॅना गठर्ड हिने बाजी मारली.

मीरा भाईंदर महापौर मॅरेथॉन दरवर्षीप्रमाणे 21 किमी, दहा किमी आणि पाच किमी अशा तीन गटांमध्ये भरवण्यात आली होती. या स्पर्धेत अंदाजे दहा हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह परदेशी स्पर्धकही सहभागी झाले होते. या महापौर मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केलं. महापौर डिम्पल मेहता आणि महापालिका आयुक्तांनी स्पर्धकांचं अभिनंदन केलं.

मॅरेथॉन विजेते

21 किलोमीटर
पुरुष
प्रथम – रंजित कुमार पटेल (पदक, 31 हजार रुपये)
द्वितीय – मिकीयास येमाता लेम्लेणु (पदक, 21 हजार रुपये)
तृतीय – विष्णु राठोड (पदक, 11 हजार रुपये)

21 किलोमीटर
महिला
प्रथम – हॅना गठर्ड (पदक, 31 हजार रुपये)
द्वितीय – मेलकम तेस फाहुन मेकोनेन (पदक, 21 हजार रुपये)
तृतीय – आरती देशमुख (पदक, 11 हजार रुपये)

10 किलोमीटर
पुरुष
प्रथम – रोहित यादव (पदक, 15 हजार रुपये)
द्वितीय – शैलेश गंगोड़ (पदक, 10 हजार रुपये)

10 किलोमीटर
महिला
प्रथम – श्री देवी सोमान्न म्हात्रे (पदक, 15 हजार रुपये)
द्वितीय – सोनिया हनुमंत मोकल (पदक, 10 हजार रुपये)