मिशन विदर्भ! राज ठाकरेंपाठोपाठ अंबादास दानवेही विदर्भ दौऱ्यावर; सर्वांचं लक्ष विदर्भावरच का?

| Updated on: Sep 18, 2022 | 12:53 PM

विदर्भातील धानपीक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अंबादास दानवे हे मंगळावारी नागपूर उमरेड मार्ग पवनी येथील गांधी गेट चौकात भेट देणार.

मिशन विदर्भ! राज ठाकरेंपाठोपाठ अंबादास दानवेही विदर्भ दौऱ्यावर; सर्वांचं लक्ष विदर्भावरच का?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर :  मराठवाडा कोकणानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते (Ambadas Danve) अंबादास दानवे हे विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत. यंदा (Vidarbha) विदर्भात सर्वच पक्षातील नेत्यांनी दौरे केले आहेत. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आता अंबादास दानवे तीन दिवस या विभागात असणार आहेत. (Heavy Rain) अतिवृष्टी आणि शेतीपिकाचे झालेल्या नुकसानीचा ते आढावा तर घेणार आहेतच पण पक्ष बांधणीचा मुद्दाही महत्वाचा आहे. यापूर्वी दानवे यांनी बीडमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंहाची त्यांनी भेट घेतली तर पक्ष वाढीच्या दृष्टीने त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या होत्या. तोट पॅटर्न आता विदर्भात होणार आहे.

विर्भातील दौऱ्यामध्ये अंबादास दानवे हे नागपूर, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणीही करणार आहेत. यंदा सर्वाधिक पाऊस हा विदर्भात झाला होता. रविवारी संध्याकाळी जालना येथून ते नागपूरकडे रवाना होणार आहेत. नुकसानीच्या पाहणीनंतर सरकारकडे त्यांचे मागणे काय असणार हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.

शेती नुकसानीच्या पाहणी बरोबरच विदर्भातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ते बैठकाही घेणार आहेत. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी या भागाचा दौरा केला होता. पक्षातील पडझडीनंतर जो तो पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यानुसार दानवे हे सोमवारी यवतमाळ येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करतील. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यासोबत जिल्ह्यातील प्रश्नांबाबत चर्चा करणार आहेत.

विदर्भातील धानपीक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अंबादास दानवे हे मंगळावारी नागपूर उमरेड मार्ग पवनी येथील गांधी गेट चौकात भेट देणार. त्यानंतर कोंढा कोसरा येथील शेतकऱ्यांच्या धानपिक नष्ट झालेल्या बुडीत क्षेत्राची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच या दौऱ्याला राजकीय किनारही असणार आहे. दरम्यान, दानवे हे आमगाव येथील शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर पक्षातील प्रश्नांचीही ते सोडवणूक करणार आहेत.