एमएमआरडीएमार्फत सुरु असलेली कामे वेळेत पूर्ण करा; मंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला कामांचा आढावा

| Updated on: Apr 18, 2022 | 10:29 PM

प्रकल्प बाधितांचे योग्य पुनर्वसन व्हावे, अत्यावश्यक असतील तेथेच आणि कमीत कमी झाडे तोडावीत, बाधित होणाऱ्या व्यक्तींना प्रकल्पाबाबत प्रत्यक्ष भेटून माहिती द्यावी, असे निर्देश आदित्य ठाकरे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

एमएमआरडीएमार्फत सुरु असलेली कामे वेळेत पूर्ण करा; मंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला कामांचा आढावा
मंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला कामांचा आढावा
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई: मुंबई शहरात एमएमआरडीएच्या (MMRDA) माध्यमातून सुरु असलेल्या तसेच प्रस्तावित कामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यामध्ये वरळी-शिवडी, नरीमन पॉईंट-कफ परेड या कामांबाबत चर्चा करण्यात आली. ही कामे करताना नागरी सुविधा (Civic amenities) कमीत कमी बाधित होतील याची दक्षता घ्यावी, जेथे खोदकाम करावयाचे आहे तेथे वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी.

प्रकल्प बाधितांचे योग्य पुनर्वसन व्हावे, अत्यावश्यक असतील तेथेच आणि कमीत कमी झाडे तोडावीत, बाधित होणाऱ्या व्यक्तींना प्रकल्पाबाबत प्रत्यक्ष भेटून माहिती द्यावी, असे निर्देश आदित्य ठाकरे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पुराचे पाणी वस्त्यातून जाऊ नये

तसेच यावेळी मिठी नदीचे प्रदूषण कमी करणे, नदीत कचरा टाकला जाऊ नये यासाठी जनजागृती करणे, नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी जाऊ नये यासाठी आवश्यक तेथे सुरक्षा भिंत बांधणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. दक्षिण मुंबईकडे येताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरीमन पॉईंट ते कफ परेड यांना जोडणारा मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गाच्या प्रगतीचाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आढावा घेतला.

वाहतूक कोंडी सुटणार

व्यावसायिक केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईतील या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होऊन वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून प्रस्तावित असणारा हा रस्ता नरीमन पॉईंटपासून कफ परेडकडे जाणाऱ्या प्रकाश पेठे मार्गापर्यंत उड्डाणपूल स्वरूपात असल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास मोठा हातभार लागणार असल्याचेही सांगण्यात आले.

दैनंदिन जीवनात बाधा येऊ

या प्रकल्पामुळे मच्छीमारांच्या दैनंदिन जीवनात बाधा येऊ नये यादृष्टीने त्यांच्यासमवेत पुन्हा एकदा चर्चा करण्यात यावी, तसेच या मार्गाच्या अंतिम मान्यतेसाठी सर्व संबंधित विभागांच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही ठाकरे यांनी यावेळी दिले आहेत.

या बैठकांना खासदार अरविंद सावंत, आमदार सदा सरवणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, आमदार दिलीप लांडे, पर्यावरणवादी अफरोज शहा यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Gunratna Sadavarte : एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढणारे सदावर्ते स्वत:च्याच बिल्डिंगमध्ये मात्र बदनाम! गुंडगिरीची भाषा आणि वर्तणुकीमुळे रहिवासी त्रस्त

Sadhvi Rithambara : हिंदूराष्ट्रासाठी प्रत्येक हिंदुंनी 4 मुलं जन्माला घाला, 2 मुलं RSS, विश्व हिंदू परिषदला द्या, साध्वी ऋतंभरांचा अजब सल्ला

RR vs KKR IPL 2022: Jos Buttler ला बॉल टाकायचा तरी कुठे? सीजनमधील दुसरी सेंच्युरी, KKR च्या गोलंदाजांची वाट लावली