मी धनंजय मुंडेंना ओळखत नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध नाही : मनीष धुरी

| Updated on: Jan 16, 2021 | 5:48 PM

धनंजय मुंडे यांना मी ओळखत नाही. त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध नाही, असेही ते म्हणाले. (MNS Manish Dhuri On Renu Sharma Allegation)

मी धनंजय मुंडेंना ओळखत नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध नाही : मनीष धुरी
Follow us on

मुंबई : “रेणू शर्मा या तरुणीच्या आरोपाला मी भीक घालत नाही. जर तिच्या कामासाठी ती माझ्या संपर्कात आली होती, तर तिने तीन वर्ष माझ्याशी मैत्री का ठेवली?” असा प्रश्न मनसे कार्यकर्ते मनीष धुरी यांनी उपस्थित केला आहे. तसेच  धनंजय मुंडे यांना मी ओळखत नाही. त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध नाही, असेही ते म्हणाले. (MNS Manish Dhuri On Renu Sharma Allegation)

“संबंधित तरुणीच्या आरोपाला मी भीक घालत नाही. येत्या काळात मी सगळे कॉल डिटेल्स सुध्दा सर्वांसमोर ठेवणार आहे. जर तिच्या कामासाठी ती माझ्या संपर्कात आली होती तर तीन तीन वर्ष का मैत्री ठेवली? ती अल्बमच्या मदतीसाठी नाही तर वेगळीच मदत मागायला ती माझ्याकडे आली होती,” असा आरोप मनीष धुरी यांनी केला.

“राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मी ओळखत नाही. त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध नाही,” असेही मनीष धुरींनी स्पष्ट केले.

हेही वाचा : मला कोणाचेही राजकीय करिअर खराब करायचे नाही : रेणू शर्मा

“कृष्णा हेगडे, मनिष धुरी हे दोघे धनंजय मुंडे यांना राजकीय मित्र म्हणून मदत करत असतील. परंतु मी कृष्णा हेगडेंचा आदर करते, ते माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतात हे मला माहीत नाही. मी मनिष धुरी यांना माझ्या अडकलेल्या अल्बम संदर्भात भेटले होते. त्यानंतर ते मला दारु पिऊन कॉल करायचे” असे रेणू शर्मा म्हणाल्या.

“ब्लॅकमेल हा एक शब्द घेवून माझ्यावर आरोप केले जात आहेत, जे चुकीचे आहेत. मी तक्रार केल्यानंतर मला धमकीचे अनेक फोन येत आहेत. एक सामान्य व्यक्ती म्हणून मला यंत्रणेने सहकार्य करावे.” असे रेणू शर्मा यांनी सांगितले.

मनीष धुरींची रेणू शर्मांविरोधात पोलिसांत तक्रार

मनसेच्या मनीष धुरींनी केलेल्या तक्रारीत रेणुकावर गंभीर आरोप केले. ”2008-09 साली माझ्या मोबाईल क्रमांकावर रेणू शर्मा हिने संपर्क केला होता. माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एके दिवशी तिने मला अंधेरीतील शेर ए पंजाबमधील आपल्या घरी बहिणीला भेटायचे आहे सांगून बोलावले. पण तिच्या घरी गेलो असता तिथे तिची बहीण नव्हती. काही वेळानंतर तिने माझ्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. पण मी तसे होऊ दिले नाही. त्यानंतर लक्षात आले की तिथे आमच्या दोघांशिवाय तिसरे कोणी तरी आहे.

मी कसाबसा तिथून निघालो. घडलेल्या प्रकारानंतर मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. तिचा फोन न घेणे, अशा बऱ्याच गोष्टी मी केल्या. त्यानंतर मला समजले की, ती आणि तिची बहीण दोघी मोठमोठ्या उच्चभ्रू लोकांशी मैत्री करतात, त्यानंतर फसवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. खंडणी काढण्याचा प्रयत्न करतात. तरीही आपण रेणू शर्मांवर फसवणुकीच्या कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा ही विनंती”, अशी तक्रार मनीष धुरी यांनी दिली आहे. (MNS Manish Dhuri On Renu Sharma Allegation)

संबंधित बातम्या : 

…तर दहा वर्षापूर्वीच माझाही धनंजय मुंडे झाला असता, मनसेच्या मनीष धुरींचाही रेणू शर्मावर गंभीर आरोप

तिने माझ्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला; मनसेच्या मनीष धुरींची रेणू शर्मांविरोधात पोलिसांत तक्रार