AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर दहा वर्षापूर्वीच माझाही धनंजय मुंडे झाला असता, मनसेच्या मनीष धुरींचाही रेणू शर्मावर गंभीर आरोप

Renu Sharma : जर रेणू शर्माच्या जाळ्यात फसलो असतो तर 2008-09 मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता, असं मनीष धुरी म्हणाले.

...तर दहा वर्षापूर्वीच माझाही धनंजय मुंडे झाला असता, मनसेच्या मनीष धुरींचाही रेणू शर्मावर गंभीर आरोप
मनीष धुरी आणि धनंजय मुंडे
| Updated on: Jan 14, 2021 | 6:16 PM
Share

मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी रेणू शर्मा (Renu Sharma) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपल्यालाही हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता, असं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं. इतकंच नाही तर मनसे नेते मनीष धुरी (MNS Manish Dhuri) यांनाही रेणू शर्माने फोन करुन, जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, असं कृष्णा हेगडे यांनी पत्रकारांना सांगितलं. (MNS Manish Dhuri serious allegation on Renu Sharma in Dhananjay Munde case)

कृष्णा हेगडे यांनी मनीष धुरी यांचं नाव घेतल्याने, त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी टीव्ही 9 मराठीने मनीष धुरी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी मनीष धुरी यांनी आपलाही दहा वर्षापूर्वीच धनंजय मुंडे झाला असता, असं म्हणत, आपली बाजू मांडली.

मनीष धुरी काय म्हणाले?

“जर रेणू शर्माच्या जाळ्यात फसलो असतो तर 2008-09 मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता. रेणू शर्मा आणि तिच्या बहिणीला उच्चभ्रू लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याची सवय आहे. कृष्णा हेगडेंनी 2010 मध्ये अनुभव घेतलाय. पण मी 2008- 2009 मध्ये फसणार होतो, मात्र माझं नशीब चांगलं म्हणून मी बचावलो. ही (रेणू शर्मा) आणि हिचं कुटुंब यामधीलच आहे असं वाटतंय”, असं मनीष धुरी म्हणाले.

कृष्णा हेगडे काय म्हणाले?

मी कोणत्या महिलेवर उगाचच आरोप कशाला करु? धनंजय मुंडे, मनीष धुरी यांच्याबाबतही असं झालं आहे. हे हनी ट्रॅपचं जाळं असं आहे, आपल्या जाळ्यात पकडून लुटायचं. आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं आहे. उद्या माझ्याबाबतही झालं असतं.  मनीष धुरी यांचाही कॉल आला होता, ते सुद्धा तसंच सांगत होते, असेही कृष्णा हेगडेंनी सांगितले.

कृष्णा हेगडे यांचा रेणू शर्मांवर आरोप

भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी याबाबत मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या. मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या, असं कृष्णा हेगडे म्हणाले.

(MNS Manish Dhuri serious allegation on Renu Sharma in Dhananjay Munde case)

संबंधित बातम्या 

रिलेशनशिपसाठी रेणू शर्माचा माझ्यावरही दबाव, कॉल, मेसेज करायची, आता माजी आमदाराचा आरोप

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.