Raj Thackeray : बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या मुद्यावर राज ठाकरेंच खूप सुंदर अचूक उत्तर

Raj Thackeray : त्यावेळी राज ठाकरे यांना महेश मांजरेकरांनी जे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, त्यावर प्रश्न विचारला. आता जे बिनविरोध निवडून आलेत, त्या ठिकाणी मतदारांनी बोटावरचं काळं कसं दाखवायचं? म्हणजे माझा मतदानाचा हक्कच तुम्ही हिरावून घेताय ना?

Raj Thackeray : बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या मुद्यावर राज ठाकरेंच खूप सुंदर अचूक उत्तर
Raj Thackeray
| Updated on: Jan 08, 2026 | 10:08 PM

यंदाच्या महापालिका निवडणुकीत सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा मुद्दा. मुंबईसह राज्यात 29 महानगर पालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार आहेत. त्यासाठी सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचार ऐन रंगात आलेला असताना अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यावरुनच आता राजकारणं सुरु झालं आहे. महेश मांजरेकर आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांना महेश मांजरेकरांनी जे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, त्यावर प्रश्न विचारला.”आता जे बिनविरोध निवडून आलेत, त्या ठिकाणी मतदारांनी बोटावरचं काळं कसं दाखवायचं? म्हणजे माझा मतदानाचा हक्कच तुम्ही हिरावून घेताय ना? हा पायंडा प्रत्येक ठिकाणी पडता कामा नये. अशा ठिकाणी 30 टक्के लोकांनी म्हटलं की, हा आम्हाला नको तर त्याला बाद केलं पाहिजे” असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी विचारला.

त्यावर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.खूप सूचक उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. “काय आहे की, व्होटिंग पॅडवर ‘नोटा’चा अधिकार आहे.पण त्या नोटांमुळे झालेला हा प्रॉब्लेम आहे” असं राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले, वाटलेल्या नोटांमुळे झालेला हा प्रॉब्लेम आहे.महेश मांजरेकर म्हणाले, जे बिनविरोध आलेत, तिथं नोटा दाबायलाही चान्स नाही. राज ठाकरे यांनी उत्तर दिलं एक्झॅक्टली! कारण नोटा मिळाल्या ना.

पण निवडणूक आयोगानं काय केलं?

“यावर उपाय म्हणजे जसं एखाद्या कामासाठी टेंडर काढलं जातं आणि त्यात काही गफलत वाटली तर री-टेंडर काढलं जातं. तसंच तिथली निवडणूक प्रक्रिया नव्यानं घेतली पाहिजे. पण निवडणूक आयोगानं काय केलं? निकाल थांबवलाय, तो सर्व निकालाबरोबर जाहीर करणार, कारण आयोग त्यांचा गुलाम आहे. बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एकही उमदेवार नाही? पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नाही? हा काय योगायोग आहे की काय आहे?” असं उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.