AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे म्हणाले, समोर क्रिकेटचं बोर्ड आहे, त्यावर टोटल लिहिलंय, तुम्ही मला…

नाशिक येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये सत्ता येताच केलेल्या कामांना उजाळा दिला.

राज ठाकरे म्हणाले, समोर क्रिकेटचं बोर्ड आहे, त्यावर टोटल लिहिलंय, तुम्ही मला...
Raj Thackeray
| Updated on: Jan 09, 2026 | 11:33 PM
Share

राज ठाकरे यांनी नाशिक येथील सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज ठाकरे म्हणाले की नाशिकमध्ये आम्ही सत्तेत आलो तेव्हा नाशिक पालिकेवर ७०० कोटीचे कर्ज होते. आम्ही महापालिका कर्जमुक्त केली आहे. आमच्या पाच वर्षाच्या काळात विरोधी पक्षाकडून आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशी महापालिका होती. रस्ते उत्तम केले होते. दर पावसाळ्यात पत्रकारांना चॅनलचे लोकं विचारायची खड्डे पडतात. मी इथल्या कंत्राटदारांची बैठक बोलावली होती. हे बजेट, तुमच्याकडे पैसे मागितले तर मला सांगा. बजेटमध्ये उत्तम रस्ते केले नाही आणि खड्डा पडला तर त्यात उभा करून मारेन असा दम दिला.नाशिकमध्ये उत्तम रस्ते झाले आणि हे होऊ शकते. या लोकांना कळू शकत नाही. पाच वर्षात फडणवीस येऊन काय बोलून गेले. ते झालं का सांगा असाही सवाल राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प, नाशिक आयटी पार्क, उड्डाण पूल, रिंग रोड, सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग, आदिवासी प्रबोधिनी अशा घोषणा केल्या होत्या.राज ठाकरे पुढे म्हणाले की,’ देवेंद्र फडणवीस यांनी काही केले नाही आणि म्हणे नाशिक दत्तक घेणार धर्माच्या नावावर झुंजवत आहे. लाडकी बहीण योजनेत दीड हजार दिले. महागाई किती वाढली. तुमचे दीड हजार निघून गेले. सिलिंडर १५०० रुपये. कुठे टिकणार आहे दीड हजार रुपये. तुमची मुलं काय विचार करतील.आमच्या भवितव्याकडे कोणी पाहिलं नाही. का तर आमचा बाप विकला गेला. आमच्या आईने पैसे घेतले. आमचं भविष्य असंच गेल असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की सभोवतालचं वातावरण बकाल आहे. त्यामुळे पोरं दुसरीकडे शिकायला जात आहेत. कशाचा काही आटोक्यात नाही. अशा लोकांच्या हाती शहरं देणार आहात का. आनंद महिंद्रा, अंबानी टाटापासून सर्व आणली. ही माणसं कधी कुठल्या शहरात गेली नाही. प्रकल्प उभे केले. पाहायला काय मिळालं पराभव. ज्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या भूलथापांना बळी पडला. आजही तेच चालू आहे. आज पैसे घ्याल. किती दिवस पैसे टिकणार आहे. तेवढ्या किंमतीसाठी शहर दावणीला बांधत आहोत. याचाही विसर पडला असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

 निवडणुका हा नुसता खेळ केलाय का ?

राज ठाकरे यांनी कशासाठी निवडणुका लढवायच्या. निवडणुका हा नुसता खेळ केलाय का ? पैसे घ्यायचे मतदान करायचं आणि पाच वर्ष बोंबलत राहायचं. हाच खेळ खेळायचा असेल तर खेळा तुम्ही असे सांगत राज ठाकरे पुढे म्हणाले की  तुमच्या चिल्ल्यापिल्यांच भविष्य चांगलं करायचं असेल तर तुम्ही शिवसेना आणि मनसेच्या हाती सत्ता द्या. पुन्हा चांगलं नाशिक घडवल्याशिवाय आपलं राहणार नाही असेही आश्वासन राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरे पुढे म्हणाले की क्रिकेटचा बोर्ड आहे, समोर. तिथे लिहिलंय टोटल. शिवसेना आणि मनसेचे किती नगरसेवक निवडून देणार. मला तिथे १०० चा आकडा पाहिजे. कुठेही गाफिल राहू नका. सज्ज व्हा असे आदेश राज ठाकर यांनी यावेळी दिला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...