राज ठाकरे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?; 23 तारखेला मुंबईत मेळावा

| Updated on: Oct 18, 2021 | 6:47 PM

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत केव्हाही निघण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे. (MNS chief Raj Thackeray to address public rally on october 23rd in Mumbai)

राज ठाकरे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?; 23 तारखेला मुंबईत मेळावा
राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Follow us on

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत केव्हाही निघण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच शिवसेनेचा दसरा मेळावा झाल्यानंतर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या मेळाव्याची माहिती दिली आहे. 23 तारखेला मुंबईत मनसेचा मेळावा आहे त्यात तुमची देखील काही उत्तर मिळतील. राज ठाकरे मेळाव्यात काय बोलतील हे माहीत नाही. पण ते आपली भूमिका जाहीर करतील आणि बऱ्याचशा गोष्टी या क्लिअर होतील, असं सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

ही जुनीच मागणी

कांचन गुरू माँ आणि राज ठाकरे यांची भेट आणि हिंदू राष्ट्राची कल्पना यावरही त्यांनी भाष्य केलं. मुळात आपला देश बहुसंख्याक हिंदूंचा देश आहे. त्यामुळे साहजिकच आहे की प्रत्येक हिंदू माणसाला वाटणार की हिंदू राष्ट्र व्हावं. त्यात त्यांची काहीच चूक नाही. परंतु परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहली आहे त्याप्रमाणे आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन जात आहोत. त्यामुळे सर्वधर्म समभाव हे घटनेप्रमाणे चालू आहे. इतर भाषिकही या देशात गुण्या गोविंदाने राहतात. म्हणून ही मागणी काही नवीन नाही. ही जुनीच मागणी आहे.. कांचनगिरी गुरू माँ पण साहेबाना भेटून गेल्या त्यांची पण तीच अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राज यांच्या रक्तात हिंदूत्व

आम्ही जो पूर्वी झेंडा बनवला होता त्यात 60 टक्के भगवा ध्वज होता. राज ठाकरे यांचे आजोबा, पणजोबा हे हिंदुत्वावर प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये हिंदुत्व आहे आणि त्यामुळे मी जेष्ठ जरी असलो तरी हा पक्षाचा धोरणाचा विषय आहे. म्हणूनच राजसाहेब ठाकरे यांनी यावर बोललेलं अधिक उचित होईल, असंही त्यांनी सांगितलं.

राज काय बोलणार?

दरम्यान, राज ठाकरे हे येत्या 23 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हिंदूत्व, भाजपबरोबरची युती, महापालिका निवडणुकीतील रणनीती आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर राज ठाकरे काय भाष्य करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मेळाव्यात राज यांच्या रडारवर कोण असेल याबाबतही सर्वांची उत्सुकता लागली आहे.

 

संबंधित बातम्या:

मोठेपण ! चंद्रकांत पाटील म्हणाले, माझी जीभ घसरली, नेमकं काय झालं?

Video : अमरावतीत जिल्हा नियोजन समिती बैठकीत राडा, यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात जोरदार खडाजंगी!

कोरोना निर्बंधात शिथीलता, राज्यातील उपाहारगृहे, दुकाने सुरु ठेवण्याची वेळ वाढवण्याचा निर्णय

(MNS chief Raj Thackeray to address public rally on october 23rd in Mumbai)