साहेब सत्य तेच बोलतात, कुणालाच सोडत नाहीत; मनसेच्या बड्या नेत्यानं वाढवली राजकारण्यांची धाकधूक

| Updated on: Mar 22, 2023 | 1:31 PM

दादरच्या शिवाजी पार्कवर आज मनसेची सभा होत आहे. गुढी पाडव्या निमित्ताने ही सभा होत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या सभेतून घणाघाती भाषण करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

साहेब सत्य तेच बोलतात, कुणालाच सोडत नाहीत; मनसेच्या बड्या नेत्यानं वाढवली राजकारण्यांची धाकधूक
Raj Thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मनसे नेते राज ठाकरे यांची आज सभा होणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कात ही सभा होणार आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी मी संपूर्ण पिक्चर दाखवेल असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यामुळे राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सभेची जोरदार तयारी झाली आहे. ठाणे, पुणे, नाशिकमधून मनसे सैनिक आले आहेत. सर्वच जण राज ठाकरे यांच्या सभेची वाट पाहत आहेत. तर मनसे नेत्यांनीही राज साहेब, सत्य तेच बोलतात. ते कुणालाही सोडत नाही, असं सांगून राजकारण्यांची धाकधूक वाढवली आहे. तसेच राज ठाकरे यांची सभा ही टर्निंग पॉइंट ठरण्याचा दावाही मनसेच्या बड्या नेत्यांनी केला आहे.

मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशासाठी आणि राज्यासाठी काय महत्त्वाचे विषय असायला हवेत यावर राज ठाकरे भाष्य करत असतात. कारण ते शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानतात. त्यामुळे त्यांचे आजचे भाषण काय असेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. माझ्यासह सर्वांना त्यांच्या भाषणाची उत्सुकता लागली आहे. आज त्यांचे भाषण ऐकून सर्वच आनंदी होतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसा राज ठाकरे यांच्याकडे आहे हे आता लोकही बोलायला लागले आहेत. कारण राज ठाकरे यांचे भाषणही बाळासाहेबांसारखेच असते, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

ठाकरी भाषा पाहायला मिळेल

आजचे त्यांचे भाषण काहीतरी वेगळे असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. साहेब जे सत्य आहे तेच बोलत असतात. त्याबद्दल ते कोणालाच सोडत नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, भाजप असो की काँग्रेस असो. 2007 साली मनमोहन सिंह यांनी अणू करार केला होता. तेव्हा त्याचे राज ठाकरे यांनी स्वागत केले होते. नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली तेव्हा विरोध केला होता. मात्र 370 कलम रद्द केले तेव्हा त्यांनी मोदींचे अभिनंदन केले होते. त्यामुळे ते जे काही आहे ते सत्य बोलतात. आज त्यांची ठाकरी भाषा लोकांना पाहायला मिळेल. आजची सभा ही टर्निंग पाँईट झाली तर आश्चर्य वाटायला नको, असंही ते म्हणाले.

पूर्ण मुव्ही असेल

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. ठाणे आणि पालघरमधून सभेसाठी जवळपास 25 हजार लोक येणार आहेत. आजची सभा ही पूर्ण मुव्ही असेल. आज राज ठाकरे प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा मांडण्याची शक्यता आहे, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.

आजचं भाषण अणूबॉम्ब असणार

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण चाललेल आहे. त्यावर तुरटी फिरवण्याचे काम राज ठाकरे यांचं भाषण आज करेल. आजचं राज ठाकरे यांचं भाषण हा अणुबॉम्ब असणार आहे. त्याचे हादरे सगळ्यांना बसणार आहेत. राज ठाकरेंची सभा ही नेहमीच रेकॉर्ड ब्रेक सभा असते. त्यांच्याच सभेचा रेकॉर्ड तेच मोडतात. बाकी कुणाला त्यांच्या सभेचा रेकॉर्ड मोडणं शक्य नाही, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.