जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच, पवारांना पुन्हा टार्गेट, टीका नेमकी कोणची

| Updated on: Dec 01, 2022 | 11:33 PM

मुस्लिम मतांसाठीच राष्ट्रवादीकडून जातीपातीचं राजकारण सुरु असून मराठा आणि इतर समाजात फूट पाडणं हाच महत्वाचा उद्देश असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे.

जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच, पवारांना पुन्हा टार्गेट, टीका नेमकी कोणची
Follow us on

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवला आहे. राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच जातीयवाद सुरु झाला असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे. राजकारणासाठी शरद पवार यांच्याकडूनच जातीयवादाचा वापर होतो, अशी टीका पुन्हा एकदा टीका राज ठाकरे यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्याच जन्मापासून सुरु झालं, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन वाद निर्माण झाल्यानंतर त्या चित्रपटाचं राज ठाकरे यांनी समर्थन केलं होतं. या चित्रपटात चुकीचे संदर्भ मांडल्याचे सांगत राष्ट्रवादीनं त्याविरोधात आंदोलनंही केले होते.

त्यावरुनच सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेतून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. जातीच्या राजकारणासाठीच महाराजांबाबतच्या काही गोष्टी समोर आणल्या जात असून हे सर्व राष्ट्रवादीकडूनच सुरु असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी टीका करताना, पवारांच्या मुलाखतीचाही उल्लेख आवर्जून केला होता. राज ठाकरे यांनी त्या मुलाखतीत पवारांना नेमकं कोणता प्रश्न केला होता आणि त्यावर पवारांचं उत्तर काय होतं तेही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी जातीय राजकारणावरुन आत्ताच बोलते असं नाही तर याआधीही सभांमधूनही त्यांनी जातीयवादावर चर्चा केली आहे असं राज ठाकरेंनी सांगितले.

मुस्लिम मतांसाठीच राष्ट्रवादीकडून जातीपातीचं राजकारण सुरु असून मराठा आणि इतर समाजात फूट पाडणं हाच महत्वाचा उद्देश असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरेंची भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढली आहे. त्यामुळं सध्या राज ठाकरे यांच्यासमोर टीकेसाठी ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच प्रमुख पक्ष आहेत,

पण यापुढेही सर्वाधिक टार्गेटवर राष्ट्रवादीचं असेल हे पुन्हा राज ठाकरे यांच्याकडून दाखवून देण्यात आले आहे.