हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही, शिवसेनेविरुद्ध मनसेची पोस्टरबाजी

| Updated on: Feb 11, 2021 | 11:13 PM

मनसेने काही चिठ्या चिकटवत ‘हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ अशा मजकूर लिहिला आहे. (MNS Poster After Hemendra Mehta joins Shiv Sena)

हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही, शिवसेनेविरुद्ध मनसेची पोस्टरबाजी
Follow us on

मुंबई : भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पोस्टरही लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर गुजराती भाषेचा वापर करण्यात आला होता. मात्र यावर मनसेने काही चिठ्या चिकटवत ‘हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ अशा मजकूर लिहिला आहे. (MNS Poster After BJP leader Hemendra Mehta joins Shiv Sena)

माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर मुंबईतील बोरिवलीत या पोस्टरवर गुजराती भाषेचा वापर केला गेला. यामुळे त्यावर मनसेने काही चिठ्या चिटकवण्यात आल्या. ‘हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही’ अशाप्रकारचे मजकूर लिहिण्यात आले होते. यामुळे शिवसेना विरुद्ध मनसे वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

भाजपला रामराम ठोकत शिवबंधन

हेमेंद्र मेहता यांचा प्रवेश हा शिवसेनेच्या फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. हेमेंद्र मेहता हे बोरिवली पश्चिममधून 3 वेळा आमदार होते. पण भाजपकडून गोपाळ शेट्टी यांना विधानसभेला तिकीट देण्यात आलं. त्यावेळी हेमेंद्र मेहता यांनी बंडखोरी केली होती. पुढे मेहता यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा एकदा ते भाजपवासी झाले. अखेर त्यांनी पुन्हा एकदा भाजपला रामराम ठोकत शिवबंधन हाती बांधलं आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या गुजराती मतदारांना आकर्षित करण्याच्या मोहिमेत मेहता यांचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिवसेनेनं त्यांना प्रवेश दिल्याचं बोललं जात आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.

मुंबईत गुजराती समाजाचा मेळावा

येत्या 2022 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे. या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे गुजराती समाजाचा मेळावा संपन्न झाला झाला. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराजभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्पेश मेहता यांच्या पुढाकारातून मालाडमध्ये हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात गुजराती समाजाच्या 21 व्यावसायिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई मा जिलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपाडा अशी घोषणा देत भाजपाला आवाहन दिले आहे. (MNS Poster After BJP leader Hemendra Mehta joins Shiv Sena)

संबंधित बातम्या : 

भाजपला झटक्यावर झटके! अजून एका नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’ सक्सेस, आता ‘रासगरबा’; 21 गुजराती उद्योगपतींचा रविवारी शिवसेनेत प्रवेश!