दादर रेल्वे स्थानकाच्या चैत्यभूमी नामकरणाचा वाद पेटला, मनसेचा तीव्र विरोध, ‘बाहेरच्यांची मागणी आमच्यावर थोपवू नका’, यशवंत किल्लेदार यांची पोस्ट व्हायरल

Yashwant Killedar on Dadar railway station Renaming: मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती दादर स्टेशनच्या नामकरणाचा वाद पेटला आहे. बाहेरच्यांची मागणी आमच्यावर थोपवू नका असे म्हणत यशवंत किल्लेदार यांनी नामकरणाला विरोध केला आहे. त्यांची याविषयीची पोस्ट व्हायरल झाली आहे.

दादर रेल्वे स्थानकाच्या चैत्यभूमी नामकरणाचा वाद पेटला, मनसेचा तीव्र विरोध, बाहेरच्यांची मागणी आमच्यावर थोपवू नका, यशवंत किल्लेदार यांची पोस्ट व्हायरल
दादर रेल्वे स्थानकाच्या चैत्यभूमी नामकरणाला मनसेचा तीव्र विरोध
| Updated on: Nov 19, 2026 | 9:41 AM

Yashwant Killedar on Dadar railway station Post: मुंबईतील गजबजलेले आणि मध्यवर्ती दादर स्टेशनच्या नामकरणाचा वाद पेटला आहे. राज्य सरकारने नुकतेच या स्टेशनचे नाव चैत्यभूमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 नोव्हेंबर रोजी या नामकरणासाठी आगामी विधिमंडळ अधिवेशनात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी जोरदार विरोध केला. दादरचे नाव बदलताना स्थानिक दादरकरांचे मत विचारात घेतले गेले नसल्याचा आरोप मनसेचे प्रभाग क्रमांक 192 चे नगरसेवक किल्लेदार यांनी केला आहे.

बाहेरच्या लोकांची मागणी थोपवू नका

Loading...

यशवंत किल्लेदार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. दादरचे नाव बदलताना स्थानिक दादरकरांना विश्वासात घेण्यात आले नाही. बाहेरच्या लोकांनी केलेल्या मागणीला दादरकरांवर थोपवण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी जेव्हा हा विषय पुढे आला होता, तेव्हा स्थानिकांनी त्याला विरोध केल्याची आठवण त्यांनी करून दिली.

“दादरचं नाव बदलताना दादरकरांचं मत विचारात घेतलं गेलं नाही…बाहेरच्या लोकांनी केलेल्या मागणीला दादरकरांवर थोपवत दादरकरांची ओळख पुसण्याचं काम सुरू आहे. तीव्र निषेध!” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. सरकारने मनमानी करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची पोस्ट

पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिणार

रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा विषय महानगरपालिकेच्या अख्त्यारित येत नाही. केंद्र सरकारच्या अख्त्यारितील रेल्वे खात्याकडे येतो. नागरिकांना काय मान्य आहे आणि काय नाही, यावरच सरकारं चालतात. त्यामुळे या निर्णयाबाबत दादरकरांची चाचपणी गरजेचे आहे, दादरकरांच्या भावना पत्राद्वारे पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असे त्यांनी सांगितले.

दादर रेल्वे स्थानकाची सुरूवात 1853 मध्ये झाली होती. अगोदर याला माहिम रोड असं नाव असल्याचे सांगण्यात येते. मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारं हे मुंबईतील सर्वात महत्त्वाचं स्थानक आहे. ब्रिटिश काळात मुंबईच्या विस्ताराला आणि प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामोरे जाण्यासाठी हे स्थानक विकसीत करण्यात आलं होते. आज दादर येथे 14 फलाट आहेत आणि ते मुंबई उपनगरीय वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us