हनी ट्रॅप… ब्लॅकमेलिंग…15 हून अधिक मुली आणि अमरावतीनंतर कोल्हापूरातही तसले घाणरेडे Video… मित्रानेच केला भांडाफोड

Kolhapur Molestation Case: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील अयान अहमद याने मुलींचे लैंगिक छळ केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूरातही तसाच प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हनी ट्रॅप... ब्लॅकमेलिंग...15 हून अधिक मुली आणि अमरावतीनंतर कोल्हापूरातही तसले घाणरेडे Video... मित्रानेच केला भांडाफोड
कोल्हापूर सेक्स स्कँडल
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 28, 2026 | 1:19 PM

Kolhapur Molestation Case: अमरावती जिल्ह्यतील परतवाडा येथील सेक्स स्कँडलने देश हादरला होता. आता तशीच घटना कोल्हापूरमधूनही समोर आल्याने खळबळ उडाली आहे. परतवाड्याप्रमाणेच आरोपी शाहिद सनदी याने अगोदर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण केले. त्याचे व्हिडिओ तयार केले. शाहिदने 15 हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी शिताफीने आरोपीला अटक केली आहे. पण राज्यात सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी होत आहे.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

पोलिसांनी याप्रकरणी शाहिद सनदी याला अटक केली आहे. आरोपी मुलींना अगोदर प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. त्यांचा विश्वास संपादन करायचा. त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवायचा. या खासगी क्षणाचे फोटो काढायचा आणि व्हिडिओ चित्रिकरण करायचा. त्यानंतर मुलींना ब्लॅकमेलिंग सुरू झाले. मुलींशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तो व्हिडिओचा वापर करत होता. जर मुलींनी नकार दिला तर त्यांना तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. एका पीडितेने हिम्मत दाखवल्यानंतर आरोपीला पोलिसांनी पकडले.

असा पकडला आरोपी शाहिद

शाहिद सनदी याने अनेक मुलींना भुरळ घातली. मुलींना तो इंटरनेटवरील प्रोफाईल आणि ओळखीचा फायदा घेऊन संपर्क साधायचा. त्यानंतर हळूहळू मैत्री करायचा. मुलींशी जवळीक करायचा. त्यानंतर शारिरीक संबंधासाठी दबाव टाकायचा. मुलींशी संबंधांचे व्हिडिओ आणि छायाचित्र घ्यायचा. त्यानंतर त्याआधारे मुलींना ब्लॅकमेल करायचा. मुलींनी कुणाला या घटनेची माहिती देऊ नये यासाठी दबाव टाकायचा. त्यांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. त्याने सर्व पीडितांना अशी धमकी दिली. आरोपी शाहिद सनदी याच्या जवळच्या मित्राला याची माहिती मिळाली. त्याने याविषयीची माहिती पोलिसांना दिली. तर एका पीडित तरुणीने हिंम्मत दाखवली. तिने आरोपीविरोधात तक्रार दिली. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. आता पुढील तपास सुरू आहे. किती मुलींनी आरोपीने फसवले हे समोर येईल. तर अजून काही पीडिता त्याच्याविरोधात तक्रारीसाठी पुढे येण्याची शक्यता आहे.

Follow Us