AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathwada MLC Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाणांना मतं किती? महायुतीला सर्वात मोठा धक्का…

Marathwada Graduates constituency election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात यंदा खेला होबे होणार हे निश्चित मानलं जात होतं. सध्याची आकडेवारी ही महायुतीची डोकेदुखी वाढवणारी आहे. यंदा सत्ताबदल होणार असे मतदारांनीच निश्चित केले होते हे आकेडवारीवरून समोर येत आहे.

Marathwada MLC Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाणांना मतं किती? महायुतीला सर्वात मोठा धक्का...
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी
| Updated on: Oct 28, 2026 | 7:54 AM
Share

NCP Pratapsingh Patil- Satish Chavan: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात यंदा पारडे फिरणार अशी प्रचारादरम्यानच चर्चा सुरू होती. सध्याची जी आकडेवारी समोर आली आहे. तिने या चर्चांना हवा दिली आहे. महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला पहिल्यांदाच मोठा सुरूंग लागल्याचे चित्र समोर आले आहे. महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. दोन राष्ट्रवादीतील या लढाईत शरद पवार यांचे पारडे जड झाले आहे. पुण्यानंतर विधान परिषदेत मराठवाड्यातून अजून एका आमदारांची एंट्री होण्याची दाट शक्यता आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणूक मतमोजणी तिसर्‍या फेरी निकाल

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महायुतीमधील अजितदादा पवार राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांची मोठी पकड मानली जात होती. तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात वातावरण असल्याचे ही मानले जात होते. इथे शिंदे सेनेचा फॅक्टरही महत्त्वाचा ठरला. अगोदर पाठिंबा मग नाराजी आणि सत्तार यांची खेळीही महत्त्वाची ठरली. मराठवाडा पदवीधर निवडणूक मतमोजणी तिसर्‍या फेरी निकाल समोर आल्यावर मोठ्या बदलाची नांदी समोर आली आहे.

डॉ. प्रतापसिंह पाटील : 78 हजार 540

सतीश चव्हाण : 55 हजार 180

रविराज साबळे : 20 हजार 470

दिलीप घुगे : 8 हजार 366

23 हजार 360 मतांनी डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत.

धाराशीवचा कोणता नेता बाजी मारणार?

छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवार हे राष्ट्रवादीच्या दोन खेम्यातील आहे. तर त्यांचा जिल्हा एकच म्हणजे धाराशीव आहे. सतीश चव्हाण हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे तर डॉ. प्रतापसिंह पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. हे दोघेही धाराशीव जिल्ह्यातील आहेत. प्रतापसिंह पाटील हे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू वेदप्रकाश पाटील यांचे चिरंजीव आहे. तर परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांचे सख्खे बंधू आहेत.  चव्हाण यांच्याविरोधात वातावरण तयार करण्यात शिंदे सेनेचा मोठा हातभार लागल्याचे चित्र आहे. या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांनी कालपासून आघाडी कायम ठेवली आहे. त्यांचे पारडे पूर्वीपासूनच जड मानले जात होते. थोड्याच वेळात चित्र अधिक स्पष्ट होईल.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...