कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्जाचे 3 हफ्ते माफ करा, खासदार राहुल शेवाळेंची केंद्रीय अर्थमंत्र्याकडे मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गृह, वाहन, शैक्षणिक, वैयक्तिक कर्जाचे हफ्ते कमीत कमी 3 महिन्यांसाठी माफ करावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे (Rahul Shewale demand loan waiver amid Corona).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्जाचे 3 हफ्ते माफ करा, खासदार राहुल शेवाळेंची केंद्रीय अर्थमंत्र्याकडे मागणी
| Updated on: Mar 26, 2020 | 6:01 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तीक कर्ज अशा सर्व प्रकारच्या कर्जाचे हफ्ते कमीत कमी 3 महिन्यांसाठी पुढे ढकलावे किंवा निदान 3 महिन्यांसाठी हे हफ्ते माफ करावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे (Rahul Shewale demand loan waiver amid Corona). त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून लेखी मागणी केली.

राहुल शेवाळे म्हणाले, “कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशावर मोठं संकट आलं आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे आणि कंपन्यांनावरही विपरित परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर, गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तीक कर्ज अशा सर्व प्रकारच्या कर्जाचे हफ्ते कमीत कमी 3 महिन्यांसाठी पुढे ढकलावे किंवा निदान 3 महिन्यांसाठी हे हफ्ते माफ करावे.”

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशासमोर उभ्या राहिलेल्या मोठ्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं. तसेच आपल्या पत्रात या योजनांबाबत समाधानही व्यक्त केलं.

खासदार शेवाळे यांनी पत्रात म्हटले की, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेली संचारबंदी, आंतरराष्ट्रीय व्यापारातील मंदी यामुळे देशातील अनेक कंपन्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. अशा परिस्थितीत, नागरिकांना कर्जाचे मासिक हफ्ते फेडणेही जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे, विविध सरकारी किंवा खासगी बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था यांच्याकडून नागरिकांनी घेतलेले गृह, वाहन, कृषी, व्यावसायिक, शैक्षणिक, वैयक्तिक आणि इतर कर्ज याबाबत सरकारने निर्णय घेणे गरजेचे आहे. या सर्व प्रकारच्या कर्जाचे हफ्ते कमीतकमी 3 महीने पुढे ढकलून अथवा 3 महिन्यांचे हफ्ते रद्द करून केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा द्यावा.”

Rahul Shewale demand loan waiver amid Corona