परमबीर सिंगांकडून तगडा वकील मैदानात, 100 कोटींच्या टार्गेटवर हायकोर्टात मोठी सुनावणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या वतीने ॲड.मुकुल रोहतगी मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत. Mukul Rohatgi appear for Parambir Singh

परमबीर सिंगांकडून तगडा वकील मैदानात, 100 कोटींच्या टार्गेटवर हायकोर्टात मोठी सुनावणी
परमबीर सिंह मुकुल रोहतगी
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 7:20 PM

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने ॲड.मुकुल रोहतगी मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत. रोहतगी यांनी परमबीर सिंग यांचे वकील म्हणून सुप्रीम कोर्टातही बाजू मांडली होती. आता ते उद्या मुंबई हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीत सिंग यांची बाजू मांडतील. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.( Mukul Rohatgi appear for Parambir Singh in Mumbai High Court for hearing of PIL against HM Anil Deshmukh)

परमबीर सिंग यांचे अनिल देशमुख यांच्यावर आरोप

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून , अनिल देशमुखांनी फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्या निवासस्थानी ACP सचिन वाझे आणि ACP संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्या वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. त्या बैठकीत महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट अनिल देशमुखांनी दिलं होतं, असा आरोप केला होता. यानंतर परमबीर सिंग सुप्रीम कोर्टात गेले होते. तिथे त्यांनी  “गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, प्रभावहीन आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे आवश्यक आहे, अशी मागणी केली होती. परमबीर सिंह यांच्याकडून मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टानं सिंग यांना हाय कोर्टात जाण्याचा आदेश दिला.

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी

परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील ॲड.मुकुल रोहतगी मुंबई हायकोर्टात बाजू मांडतील.

मुकुल रोहतगी कोण आहेत?

मुकुल रोहतगी ज्येष्ठ कायदेतज्ञ आहेत. त्यांनी भारताचे 14 वे ॲटर्नी जनरल म्हणून काम पाहिलं आहे. 2014 ते 2017 या कालावधीत ते भारताचे ॲटर्नी जनरल होते. मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात 2002 च्या गुजरात दंगली प्रकरणी गुजराज राज्य सरकारची बाजू मांडली होती. बेस्ट बेकरी, झहिरा शेख खटल्यांमध्येही त्यांनी युक्तिवाद केला होता. मुकुल रोहतगी यांनी गेल्यावर्षी टिकटॉकची केस लढवण्यास नकार दिला होता.

संबंधित बातम्या:

Parambir Singh : ‘मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन केलेली बेकायदेशीर बदली रद्द करा’, परमबीर सिंगांची मागणी

Sachin Vaze Case : एटीएसने जप्त केलेली व्हॉल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधल्या बिल्डरची!, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

विरोधकांकडून आरोपांची मालिका कशासाठी?; रोहित पवारांचं सूचक ट्विट

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.