मुंबईत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे 5 रुग्ण, संपर्कातील 40 जणांच्या पुन्हा चाचण्या

| Updated on: Jan 05, 2021 | 6:43 PM

याबाबत निर्णय संध्याकाळी किंवा उद्या होईल," असेही अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले. (Mumbai 40 People Retested After Corona New Strain Patient Found)

मुंबईत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे 5 रुग्ण, संपर्कातील 40 जणांच्या पुन्हा चाचण्या
कोरोना चाचणी प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे 5 रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात 40 जण आले होते. या सर्वांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून, त्या निगेटिव्ह आल्या आहे. मात्र पुन्हा एकदा त्यांच्या टेस्ट केल्या जातील, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. (Mumbai 40 People Retested After Corona New Strain Patient Found)

“युके आणि आखाती देशातून जे प्रवासी येत आहेत, त्यांना 7 दिवस क्वारंटाईन ठेवलं जातं आहे. त्यांच्या टेस्ट केल्या जात आहे. त्यासाठी नियमावली तयार केली आहे,” असेही सुरेश काकाणी यांनी सांगितले.

“दरम्यान कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आढळलेले पाचपैकी चार रुग्ण हे 21 डिसेंबरपूर्वी आले आहेत. ते चौघे जण विमान सेवा बंद करण्यापूर्वी घरी पोहोचले होते. त्यांचा तपास घेऊन पालिकेने त्यांना क्वारंटाईन केले आहे. तर विमानसेवा बंद केल्यानंतर म्हणजेच 21 डिसेंबरनंतर 1 जण भारतात आला आहे. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.”

“या 5 यापैकी 2 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर इतर तिघांचे अहवाल हे लवकरच येतील. या प्रवाशांबाबत टास्क फोर्स प्रोटोकॉलनुसार पुढचा निर्णय घेईल,” असेही सुरेश काकाणी यांनी सांगितले. (Mumbai 40 People Retested After Corona New Strain Patient Found)

“राज्यातील नाईट कर्फ्यूबाबत राज्य शासन, पोलीस यांनी निर्णय घेतला होता. या नाईट कर्फ्यूचा आज शेवटचा दिवस आहे. हा निर्णय वाढवणार की नाही, याबाबत निर्णय संध्याकाळी किंवा उद्या होईल,” असेही अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई 

“दरम्यान सोहेल खान, अरबाज खान, निर्वान खान यांची ही पहिली केस आहे. ज्यांनी या नियमांचे उल्लघंन केले आहे. यामध्ये एफआयआर बीएमसीकडून दाखल केला आहे. पोलीस त्यावर कारवाई करतील. सध्या त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आला आहे,” असेही ते म्हणाले.

लसीकरणाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात 

“लसीकरण जेव्हा सुरू केले जाईल, तेव्हा लस साठवणुकीचे ठिकाण, लस वाहतूक याचा सर्व रोड मॅप महापालिका पोलिसांना देईल. त्यासोबतच पोलीस आणि महापालिका सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात असतील,” असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत 100 लसीकरण केंद्रांची तयारी

मुंबईत लसीकरणासाठी 100 केंद्र तयार करण्यात येतील. या केंद्राद्वारे एका दिवशी 50 हजार लोकांना लस टोचण्यात, येईल असं सुरेश काकाणी म्हणाले. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात 10 हजार लोकांपासून सुरुवात करण्यात येणार आहे, असं सुरेश काकाणी म्हणाले. प्रत्येक वॉर्ड मध्ये किमान ५ लसीकरण केंद्रे असतील,अशी तयारी सध्या सुरु असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. (Mumbai 40 People Retested After Corona New Strain Patient Found)

संबंधित बातम्या : 

मुंबईतील कोव्हिड सेंटरचे जम्बो लसीकरण केंद्रात रुपांतर, दर दिवसाला अडीच हजार लस टोचणार