मुंबईतील कोव्हिड सेंटरचे जम्बो लसीकरण केंद्रात रुपांतर, दर दिवसाला अडीच हजार लस टोचणार

जम्बो लसीकरण केंद्र हा त्याचाच एक भाग असल्याची माहिती कोव्हिड सेंटरचे डीन डॉ. राजेश ढेरे यांनी दिली. (Mumbai Jumbo Covid Center Convert To Vaccination Center)

मुंबईतील कोव्हिड सेंटरचे जम्बो लसीकरण केंद्रात रुपांतर, दर दिवसाला अडीच हजार लस टोचणार
देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 3:52 PM

मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या जम्बो कोव्हिड सेंटरचे रुपांतर आता जम्बो लसीकरण केंद्रात केले जाणार आहे. मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची जय्यत तयारी केली जात आहे. जम्बो लसीकरण केंद्र हा त्याचाच एक भाग असल्याची माहिती कोव्हिड सेंटरचे डीन डॉ. राजेश ढेरे यांनी दिली. (Mumbai Jumbo Covid Center Convert To Vaccination Center)

मुंबईतील जम्बो कोविड सेंटरचे रुपांतर हे जम्बो लसीकरण केंद्रांमध्ये केले जाणार आहे. मुंबईतील बीकेसी, गोरेगाव नेस्को, दहिसर, मुलुंड, NSCI वरळी, या ठिकाणी ही जम्बो लसीकरण केंद्रे असतील. जम्बो कोव्हिड सेंटरच्या मोकळ्या जागेत ही लसीकरण केंद्र उभारली जाणार आहेत.

कोव्हिड सेंटर आणि लसीकरण केंद्र यातील लोकांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल. जम्बो कोव्हिड सेंटरची रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे आता जम्बो कोव्हिड सेंटर्समध्ये फारसे रुग्ण नाहीत. त्यामुळे त्या सेंटरचा वापर लसीकरण केंद्रांसाठी केला जाईल, असे डॉ. राजेश ढेरे म्हणाले.

बीकेसीमधील कोव्हिड सेंटरमध्ये जेथे रुग्ण नाहीत, अशा जागेत जम्बो लसीकरण केंद्र सुरू होत आहे. यात दिवसाला अडीच ते पावणे तीन हजार रुग्णाला लस देण्यात येणार आहे. या लसीकरण केंद्रात 10 युनिट असणार आहे. यातील प्रत्येक युनिटमध्ये डॉक्टरांची स्वतंत्र टीम असणार आहे. या जम्बो लसीकरण केंद्राचा जम्बो कोविड केंद्राशी कोणतीही संबंध नसेल. ही सर्व व्यवस्था स्वतंत्र असणार आहे.

कोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई सज्ज

मुंबईतील चार प्रमुख रुग्णालयात कोरोनाची लस ठेवली जाणार आहे. यात मुंबईतील सायन, केईएम, नायर आणि कूपर अशा चार रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच कांजूरमार्ग येथील आरोग्य विभागाच्या इमारतीत 5 हजार स्के. फूट ही कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी या पाच ठिकाणी लसीची साठवणूक केली जाईल.

मुंबईत 100 लसीकरण केंद्रांची तयारी

मुंबईत लसीकरणासाठी 100 केंद्र तयार करण्यात येतील. या केंद्राद्वारे एका दिवशी 50 हजार लोकांना लस टोचण्यात, येईल असं सुरेश काकाणी म्हणाले. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात 10 हजार लोकांपासून सुरुवात करण्यात येणार आहे, असं सुरेश काकाणी म्हणाले. प्रत्येक वॉर्ड मध्ये किमान ५ लसीकरण केंद्रे असतील,अशी तयारी सध्या सुरु असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. (Mumbai Jumbo Covid Center Convert To Vaccination Center)

संबंधित बातम्या : 

कोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई सज्ज, ‘या’ पाच ठिकाणी लसीचे स्टोरेज

मुंबईचं ‘जम्बो’ प्लॅनिंग, एका दिवसात 50 हजार जणांना लस टोचण्याचं नियोजन

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.