कोरोनाकाळात केलेल्या कामाचं कौतुक, मुंबई मनपा आयुक्तांचा स्पीक इंडिया संस्थेकडून गौरव

| Updated on: Jul 23, 2021 | 6:54 PM

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी कोरोना या साथ रोगाच्या काळात संघ भावनेने दिवस-रात्र काम करुन मुंबईकरांची सेवा करीत आहेत.

कोरोनाकाळात केलेल्या कामाचं कौतुक, मुंबई मनपा आयुक्तांचा स्पीक इंडिया संस्थेकडून गौरव
Follow us on

मुंबई : महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी कोरोना या साथ रोगाच्या काळात संघ भावनेने दिवस-रात्र काम करुन मुंबईकरांची सेवा करीत आहेत. याच अनुषंगाने ‘एक्सलन्स इन क्रायसिस मॅनेजमेंट’ या पुरस्काराने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा ‘स्पीक इंडिया’ या प्रथितयश संस्थेद्वारे नुकताच विशेष गौरव करण्यात आला आहे. (Mumbai : BMC Commissioner Iqbal Singh Chahal gets ‘Excellence In Crisis Management’ award for handling Covid-19 crisis)

या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना महानगरपालिका आयुक्तांनी सदर पुरस्कार आणि गौरव हा खऱ्या अर्थाने महानगरपालिकेच्या सर्व कामगार – कर्मचारी व अधिकाऱ्यांचा असल्याचे नमूद करत पुरस्कार त्यांना व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संघ भावनेला समर्पित केला आहे.

भारतातील प्रशासकीय सेवेत वर्षभरात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना ‘स्पीक इंडिया’ या संस्थेद्वारे दरवर्षी गौरविले जाते. यंदाच्या पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱया भारतीय प्रशासकीय सेवेतील 10 अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. या अंतर्गत ‘एक्सलन्स इन क्रायसिस मॅनेजमेंट’ या पुरस्काराने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांचा गौरव करण्यात आला आहे.

यंदाच्या पुरस्कार निवड समितीमध्ये विविध क्षेत्रातील 7 मान्यवरांचा समावेश होता. या निवड समितीने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

इतर बातम्या

Maharashtra landslide death toll : राज्यात आतापर्यंत 129 मृत्यू, तळीये दुर्घटनेतील मृतांचे बळी वाढतेच, थोरातांकडून आकडा वाढण्याची भीती

महाराष्ट्रात पावसाचं थैमान, राज्य संकटात, तातडीने योग्य ती मदत पोहोचवा, राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र

ढगफुटीचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही, तळीये गावात कालच मदत पोहोचली होती: उद्धव ठाकरे

(Mumbai : BMC Commissioner Iqbal Singh Chahal gets ‘Excellence In Crisis Management’ award for handling Covid-19 crisis)