महाराष्ट्रात पावसाचं थैमान, राज्य संकटात, तातडीने योग्य ती मदत पोहोचवा, राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र

महाराष्ट्र सध्या संकटात आहे. ह्या अवघड परिस्थितीत सर्व महाराष्ट्र सैनिकांनी जितकं जमेल तितकी मदत पूरग्रस्तांना करावी असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात पावसाचं थैमान, राज्य संकटात, तातडीने योग्य ती मदत पोहोचवा, राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

मुंबई : महाराष्ट्रात पावसाने दाणादाण उडवलेली आहे. आज महाराष्ट्राला हादरविणाऱ्या तीन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. महाडच्या तळीये गावात दरड कोसळून 32 लोकांचा लोकांचा मृत्यू झालाय. साताऱ्यातल्या आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 लोकांचा मृत्यू झालाय. तर तिकडे चिपळूणमध्येही 17 घरांवर दरड कोसळून जवळपास 20 लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. याच पार्श्वभूमीवर आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सैनिकांना पुढे यावं, तातडीने जशी जमेल तशी मदत तरावी, अशा आशयाचं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलं आहे.

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं…

माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो,

महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे.

ह्या अवघड परिस्थितीत मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी असे आवाहन करतो. आत्ता लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोचेल असं पहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी.

महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये.

जय महाराष्ट्र !

राज ठाकरे

(Crisis in maharashtra MNS Worker Should be help Flood Affected people Says Raj Thackeray)

हे ही वाचा :

Maharashtra Landslide : महाराष्ट्रावर दरडींचा घाला, रत्नागिरी रायगड आणि साताऱ्यात कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त, आतापर्यंत 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

Video : साताऱ्याच्या आंबेघरवर आभाळ कोसळलं, दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू

राज्यातील आपत्कालीन स्थितीत बचाव, मदतकार्यासाठी सैन्यदलांची मदत, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचे उपमुख्यमत्र्यांना आश्वासन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI