मुंबईतील व्यावसायिकाला डी-कंपनीच्या नावाने धमकी, थेट ५ कोटी रुपयांची… प्रकरण चर्चेत

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाला डी-कंपनीच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे.

मुंबईतील व्यावसायिकाला डी-कंपनीच्या नावाने धमकी, थेट ५ कोटी रुपयांची... प्रकरण चर्चेत
Riyaz Bhati
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 15, 2026 | 10:42 AM

मुंबईत एका व्यावसायिकाकडे कुख्यात डी-कंपनीच्या नावाने ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बांधकाम व्यावसायिक मोहम्मद फारुख शेख यांनी मुंबई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत बांधकाम व्यावसायिक रिजवी यांच्या पत्नी रुबीना रिजवी आणि गुंड रियाज भाटी यांच्याविरोधात आरोप करण्यात आले आहेत.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, रिजवी यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात एनओसी आणि वकिलांची फी याबाबत वाद निर्माण झाला होता. या वादातूनच खंडणीचा प्रकार समोर आला. २७ सप्टेंबर रोजी रियाज भाटी याने स्वतःला डी-कंपनीचा सदस्य असल्याचे सांगत व्यावसायिकाकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास वाईट परिणाम होईल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. व्यावसायिकाच्या हॉटेलमध्ये जाऊन कथितपणे धमकी देतानाचा रियाज भाटीचा व्हिडिओही समोर आला आहे.

Loading...

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, एनओसी न दिल्यास डी-कंपनीमार्फत हत्या घडवून आणण्याची धमकी रुबीना रिजवी यांनीही दिली. रियाज भाटी याआधीही अशा अनेक खंडणी आणि धमकीच्या प्रकरणांत आरोपी असून सध्या तो जामिनावर आहे.

या तक्रारीची चौकशी मुंबई क्राईम ब्रँच युनिट २ कडून सुरू करण्यात आली आहे. युनिट २ ने रुबीना रिजवी यांना समन्स बजावले असून १७ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात पुढील कारवाई करण्यापूर्वी सर्व बाजूंची सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट केले आहे.

डी-कंपनीच्या नावाने खंडणी मागण्याच्या अशा घटनांमुळे व्यावसायिक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेण्यात आली असून आरोपींविरोधात कायद्याच्या कक्षेत कारवाई होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us