एक कॉल, एक क्लिक आणि खात्यातून उडाले 6 लाख, कॉल गर्लची सेवा विद्यार्थ्याला महागात!

Mumbai Call Girl Scam : कॉल गर्लची सेवा मुंबईतील विद्यार्थ्याला चांगलीच महागात पडली. 'गुगल' द्वारे कॉल गर्लचा शोध घेणे एका 23 वर्षीय विद्यार्थ्याला भलतेच महागात पडले आहे. त्याची 6 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे.

एक कॉल, एक क्लिक आणि खात्यातून उडाले 6 लाख, कॉल गर्लची सेवा विद्यार्थ्याला महागात!
मुंबई कॉल गर्ल
Image Credit source: गुगल
| Updated on: May 14, 2025 | 2:50 PM

Online Fraud Call Girl Service : मुंबईतील वडाळा पश्चिममध्ये राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाला त्याचा आंबटशौक चांगलाच महागात पडला. ऑनलाईन कॉल गर्ल सर्व्हिसच्या चक्करमध्ये त्याचे बँक खाते रिकामे झाले. त्याला सायबर भामट्यांनी 6.10 लाखांचा गंडा घातला. या भुरट्यांनी त्याचे आधार आयडी आणि लोकेशन ट्रेस करून त्याला इंगा दाखवला. हा 23 वर्षीय तरुण अंधेरीतील एका खासगी कंपनीत रिसर्च इंटर्न म्हणून काम करतो. ऑनलाईन कॉल गर्ल सर्व्हिसच्या नावाखाली त्याला भामट्यांनी 6 लाखाहून अधिकचा चुना लावला.

6 लाख उकळले

कॉल गर्लची सेवा मुंबईतील विद्यार्थ्याला चांगलीच महागात पडली. ‘गुगल’ द्वारे कॉल गर्लचा शोध घेणे एका 23 वर्षीय विद्यार्थ्याला भलतेच महागात पडले आहे. त्याची 6 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. सायबर भामट्याने त्याला जाळ्यात ओढून, पोलिसांची तसेच बदनामीची भीती घालून एकूण सहा लाख रुपये उकळले आहे. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

असा अडकला जाळ्यात

तक्रारदार विद्यार्थी मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे. तो एका खासगी कंपनीत रिसर्च ट्रेनी म्हणून काम करतो. 4 एप्रिलला त्याने ‘गुगल’द्वारे एस्कॉर्ट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांची शोधाशोध सुरू केली. एका संकेतस्थळावर त्याला एक व्हॉट्सॲप क्रमांक मिळाला. त्यावर संपर्क साधून सेवेची मागणी करताच तीन हजार रूपयांना व्यवहार ठरला. विद्यार्थी जाळ्यात येताच त्याच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात झाली.

आरोपींनी सुरुवातीला तीन हजार रुपये घेतल्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट, इन्शुरन्स, प्रोसेसिंग फी, पोलीस पडताळणी आणि जीएसटीच्या निमित्ताने सहा लाख रुपये उकळले. विद्यार्थ्याने पैसे देण्यास नकार देताच सायबर भामट्यांनी पोलिसांना सांगून बदनामीची भीती घातली. याच भीतीला बळी पडून त्याने पैसे भरले. अखेर, आणखी पैशांची मागणी झाल्याने त्याला संशय आला आणि त्यानी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांची हेल्पलाईन, मदत क्रमांक 1930 वर संपर्क साधला. त्यानंतर त्याने सर्व हकिकत सांगितली. पोलिसांनी तातडीने तक्रारीची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.