Mumbai Corona | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल 7473 लहान मुलं बाधित, एकाचा मृत्यू

| Updated on: Jul 03, 2021 | 8:07 AM

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत 0 ते 9 वर्षापर्यंतच्या तब्बल 7473 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. तसेच यात एका मुलाचा दुर्दवाने मृत्यूही झाला आहे.

Mumbai Corona | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल 7473 लहान मुलं बाधित, एकाचा मृत्यू
Corona Mumbai
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट थोपवल्यानंतर आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत 0 ते 9 वर्षापर्यंतच्या तब्बल 7473 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. तसेच यात एका मुलाचा दुर्दवाने मृत्यूही झाला आहे. (Mumbai City Corona second wave affected 7473 children)

तब्बल 7473 लहान मुलं बाधित

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत 0 ते 9 वर्षापर्यंतच्या तब्बल 7473 लहान मुलं बाधित झाली आहेत. ही सर्व मुलं साधारण फेब्रुवारीच्या मध्यानंतर 19 फेब्रुवारी ते 1 जून 2021 या कालावधीत कोरोनाग्रस्त झाली आहेत. तर गेल्यावर्षी मार्चपासून आतापर्यंत 12845 मुलांना कोरोनाची लागण झाली. यात 55 टक्के मुले तर 45 टक्के मुली कोरोनाबाधित झाल्या आहेत.

तसेच गेल्या दीड वर्षाच्या कोरोनाकाळात 10 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण 32 हजार 854 जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये 56 टक्के मुलं तर 44 टक्के मुली बाधित झाल्या आहेत. तर या वयोगटातील एकूण 40 मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात पहिल्या लाटेत 31 आणि दुसऱ्या लाटेत 9 जणांचा मृत्यू झाला.

लहान वयोगटातील मुले धडधाकट 

गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा सर्वाधिक धोका हा ज्येष्ठ आणि सहव्याधी असलेल्यांना होता. कोरोनामुळे दीड वर्षात मुंबईत एकूण 15451 जणांना जीव गमवावा लागला आहे. या मृतांमध्ये 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांची संख्या 13228 आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लागण झालेल्या या वयोगटातील मुले धडधाकट असल्याचे समोर आले आहे. या मुलांमध्ये तयार असलेल्या अँटीबॉडीजमुळे ते कोरोनाचा सामना करत आहे. यामुळे एक समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे.

लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड

मुंबईतील मालाड कोविड सेंटरमध्ये 2170 बेड उपलब्ध आहेत. हे सेंटर तिसऱ्या लाटेसाठी पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात येणार आहे. यात मालाड, महालक्ष्मी, सोमय्या ग्राऊंड, नेस्को सेंटर 2, कांजूरमार्ग या पाच ठिकाणांचा समावेश आहे. यात लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड उपलब्ध करण्यात आला आहे. यात एकूण 7000 बेड उपलब्ध होणार आहेत
मुलासोबत त्यांच्या पालकांना देखील राहण्यासाठी सुविधा उपलब्ध असणार आहे, असेही सुरेश काकाणी म्हणाले.

(Mumbai City Corona second wave affected 7473 children)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी: मुंबई विमानतळालगतच्या 80 हजार झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

Coroanvirus: मुंबईत 90 लाखांच्या टार्गेटपैकी 44 लाख नागरिकांचं लसीकरण संपन्न: आदित्य ठाकरे

देशातील डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या 70 च्या आसपास, मुंबई महापालिका तिसऱ्या लाटेसाठी तयार: किशोरी पेडणेकर