CJP Mumbai Protest : CJP च्या आंदोलनाआधी आशिष शेलारांनी निवडणूक आयोग, SIR प्रक्रियेची सांगितली दुसरी बाजू

भाजपने अभिजीत दीपके यांच्या मुंबईतील आंदोलनावर टीका केली आहे. आज गांधी जयंतीदिनी मुंबईतील शिवाजी पार्कामध्ये सीजेपीने आंदोलन पुकारलं आहे.

CJP Mumbai Protest : CJP च्या आंदोलनाआधी आशिष शेलारांनी निवडणूक आयोग, SIR प्रक्रियेची सांगितली दुसरी बाजू
Bjp on cjp mumbai protest
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 3:32 PM

सीजेपीने मुंबईमध्ये आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्कामध्ये आज अभिजित आणि जेनझीचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहे. संध्याकाळी ४ वाजता या आंदोलनाला अधिकृतपणे सुरुवात होणार आहे. देशाच्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्याच पार्श्वभूमिवर आता राजकीय पक्षांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे. पण आता या आंदोलनावरुन भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपाने पत्रकार परिषद घेत सीजेपी करत असलेल्या अशा आंदोलनाची गरज काय असं म्हटलं आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार एसआयआर प्रक्रिया सुरु केली आहे. त्यांनी त्यांचे निर्णय घेतले. कार्यक्रम घोषित केला. पण विरोधकांकडून आरोपांचं राजकारण सुरु आहे. एसआयआरच्या प्रक्रियेला राबवण्यापूर्वी निवडणूक आयोगाने गल्ली ते दिल्ली सर्व राजकीय पक्षांबरोबर बैठका घेतल्या. या सगळ्या प्रकाराची राजकीय पक्षांना माहिती दिली आहे. नागरिकांनाही पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. विरोधकांची वृत्ती छिद्रान्वेषी (खोट काढणारा, दोषदर्शी) आहे. फेक नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा उद्देश आहे, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे.

एसआयआरची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता थोडेथोडके उर्वरित मॅपिंग बाकी आहे. त्याआधी आता हे आंदोलन होत आहे. तर हे आंदोलन नेमकं कशासाठी हा मुद्दा आहे. अभिजित दीपकेंना या विषयावर आंदोलन करण्याचा अधिकार काय? अशा प्रकारच्या आंदोलनांच्याबाबतीत नागरिकांनी काही दखल घेण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी आंदोलनावर टीका केली आहे.

Loading...

दरम्यान, आज 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्ताने विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठ्या आंदोलनाची घोषणा दिली होती. त्याप्रमाणे सुरुवात केली आहे. राजीनामा न आल्यास हे आंदोलन देशभर आक्रमक वळण घेईल असंही म्हटलं होतं. त्यामुळे आता विरोधक आणि सत्ताधारी या प्रकारावरुन आमनेसामने यणार आहेत. त्याचवेळी सीजेपी हाक दिलेल्या आंदोलनात मुंबईत संध्याकाळी किती लोक जमणार हे पाहणंही तितकचं महत्त्वाचं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us