AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP : शिवाजी पार्कमध्ये ‘गद्दार ज्ञानू मस्ट गो’च्या बॅनरने वेधलं लक्ष, राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP रस्त्यावर

मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये CJP तर्फे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. 'जेलभरो'च्या हाकेला प्रतिसाद देत कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारली असूनही, जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. आदित्य ठाकरेही आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता असल्याने परिसरात राजकीय वातावरण तापले आहे.

| Updated on: Oct 02, 2026 | 4:37 PM
Share
निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPच्या वतीने  मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनासाठी शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक जमा झाले असून, आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे.  ठाकरे बंधूंकडून देखील या आंदोलनाना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.

1 / 5
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आयोजकांना आंदोलनासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली होती. तसेच, परिसरातील काही स्थानिकांनीही या आंदोलनाला विरोध केल्याचं सांगण्यात आलं होतं.  खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली आहे. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका सीजेपीने घेतली आहे.

2 / 5
आंदोलनस्थळी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विविध बॅनर झळकले. यामध्ये ‘गद्दार ज्ञानू मस्ट गो’ असा मजकूर असलेल्या बॅनरने विशेष लक्ष वेधलं. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात येत असून, आंदोलनाला ‘जेलभरो’ आंदोलनाचे स्वरूप आलं आहे.

3 / 5
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या संभाव्य सहभागाच्या पार्श्वभूमीवरही परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या संभाव्य सहभागाच्या पार्श्वभूमीवरही परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

4 / 5
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शिवाजी पार्क परिसरात राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती, घोषणाबाजी आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त यामुळे परिसरात लक्षवेधी परिस्थिती पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते, सामान्य नागरिक इथे सहभागी झाले असून विविध घोषणांनी परिवार दणाणून गेला.

5 / 5
Follow Us
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले