आधी महिलेचे कपडे उतरवले मग तिच्यासोबत…मुंबईच्या प्रायवेट कंपनीमधील धक्कादायक घटना

मुंबईत कॉर्पोरेट क्षेत्रात गुन्हेगारी वाढताना एका खासगी कंपनीतील ५१ वर्षीय महिलेला बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक छळ व मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीचे एमडी आणि इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आधी महिलेचे कपडे उतरवले मग तिच्यासोबत...मुंबईच्या प्रायवेट कंपनीमधील धक्कादायक घटना
harassment
Updated on: Dec 01, 2025 | 2:03 PM

मुंबईत सध्या कॉर्पोरेट सेक्टरमधील गुन्हेगारीत प्रचंड वाढ होत आहे. मुंबईतील खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका ५१ वर्षीय महिलेला बंदुकीचा धाक दाखवत तिचा लैंगिक छळ आणि मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तिचा विनयभंग झाल्याची तक्रार तिने पोलिसात दाखल केली आहे. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि संस्थापक सदस्य जॉय जॉन पास्कल पोस्ट यांच्यासह एकूण 6 जणांविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला आरोपींनी कंपनीच्या कार्यालयात बोलावले होते. यानंतर मुख्य आरोपी जॉय जॉन पास्कल पोस्ट याने बंदुकीचा धाक दाखवत त्या महिलेला तिचे कपडे काढायला लावले. यानंतर आरोपींनी महिलेसोबत अश्लील चाळे केले, तसेच तिला शिवीगाळ केली. यानंतर तिला शारीरिक त्रास दिला.

एवढंच नव्हे तर आरोपींनी महिलेचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो बनवले. त्यानंतर तिला हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच या घटनेबद्दल कोणाला काही सांगितले तर तुला मारुन टाकू, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी महिलेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी आरोपींवर कठोर कलम लावली

यानंतर घाबरलेल्या महिलेने तात्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. या महिलेने घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला. या संपूर्ण घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, एकूण सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर गुन्ह्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक जॉय जॉन पास्कल पोस्ट यांच्यासह इतर पाच अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींवर कठोर कलम लावली आहेत.

भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत कलम ३५४अ (लैंगिक छळ), कलम ३५४ब (कपडे काढणे किंवा तसा प्रयत्न करणे), कलम ३२६ (गंभीर दुखापत पोहोचवणे), कलम ५०९ (शब्द, कृती किंवा हावभावाने महिलेचा विनयभंग), कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी/जीवे मारण्याची धमकी), माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम ६६अ (आक्षेपार्ह संदेश पाठवणे) अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लवकरात लवकर अटक करण्यासाठी तपास सुरु

दरम्यान या घटनेमुळे कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन कसून चौकशी करत असून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी तपास करत आहेत.