Central-Western Railway Mega block : मध्य-पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक का? रेल्वेने काय निर्णय घेतला?

Central-Western Railway Mega block : मुंबईत उपनगरीय रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक असतो. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने उपनगरीय रेल्वे मार्गावर ही दुरुस्तीची कामं काढली जातात. यंदाच्या रविवारसाठी रेल्वेने काय निर्णय घेतलाय.

Central-Western Railway Mega block : मध्य-पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक का? रेल्वेने काय निर्णय घेतला?
Mumbai Local
| Updated on: Sep 19, 2026 | 7:59 AM

मुंबईत दर रविवारी उपगनरीय रेल्वे मार्गावर काही तासांसाठी ब्लॉक घेतला जातो. रुळ, सिग्नल दुरुस्ती तसच अन्य कामांसाठी हा ब्लॉक असतो. ब्लॉकच्या काळात काही नियमित धावणाऱ्या लोकल रद्द केल्या जातात. लोकल सेवा उशिराने सुरु असते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने उपनगरीय रेल्वे मार्गावर ही दुरुस्तीची कामं काढली जातात. सध्या मुंबापुरीत गणेशोत्सव सुरु आहे. लाखो भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत. आज गौरी-गणपती विसर्जन आहे. त्यानंतर उद्या म्हणजे रविवारपासून भाविकांची गर्दी वाढेल. लालबागचा राजा, जीएसबी तसच अन्य प्रसिद्ध गणेश मंडळांच्या मंडपात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळणार. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी नियमित मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी नियमित ब्लॉक उद्या रविवारचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रविवारी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊनच रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. मात्र मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत देखभाल कामांसाठी विशेष ब्लॉक असेल. मुख्य, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि बेलापूर-उरण पोर्ट मार्गावरील लोकल सेवा दिवसा सुरळीत राहील. ठाणे-कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील कामांमुळे काही मेल-एक्स्प्रेस जलद मार्गावरून वळवण्यात येतील. त्यामुळे लोकल सेवा 10 ते 15 मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे.

अनंत चतुर्दशीसाठी पश्चिम रेल्वेवर विशेष गाड्या

अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनादरम्यान लाखो गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष वाहतुकीचे नियोजन केले आहे. विसर्जनाच्या रात्री चर्चगेट विरार मार्गावर 12 विशेष उपनगरीय लोकल चालविण्यात येणार असून, चर्नी रोड स्थानकावरील लोकलच्या थांब्यांमध्येही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी, जुहू आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी सहा अशा एकूण 12 विशेष धीम्या लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चर्चगेटहून विरारकडे रात्री १.१५ ते पहाटे ३.४५ या वेळेत, तर विरारहून चर्चगेटकडे रात्री १२.१५ ते पहाटे ३.०० या वेळेत या विशेष लोकल धावणार आहेत. चचर्गेटहून विरारसाठी रात्री १.१५, रात्री १.४५, रात्री २.१५, रात्री २.५५, रात्री ३.१५ आणि रात्री ३.४५ वाजता लोकल सुटेल. परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री १२.१५, रात्री १२.३०, रात्री १.१०, रात्री १.३०, रात्री २ आणि रात्री ३ वाजता लोकल सुटेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us