पश्चिम रेल्वे मार्गावर 15 डब्यांच्या 25 लोकल ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रुजू

| Updated on: Jun 28, 2021 | 2:38 PM

Mumbai Local Train | यापूर्वी चर्चगेट ते विरार 15 डब्यांची जलद लोकल ट्रेन सुरु करण्यात आली होती. मात्र, तरीही प्रवाशांची गर्दी होत असल्याने अनेकांची गैरसोय होत होती.

पश्चिम रेल्वे मार्गावर 15 डब्यांच्या 25 लोकल ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रुजू
वेस्टर्न रेल्वे
Follow us on

मुंबई: पश्चिम रेल्वेमार्गावर सोमवारपासून 15 डब्यांच्या 25 लोकल गाड्या पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. अंधेरी ते विरार धीम्या मार्गावर या लोकल ट्रेन धावणार आहेत. यापूर्वी चर्चगेट ते विरार 15 डब्यांची जलद लोकल ट्रेन सुरु करण्यात आली होती. मात्र, तरीही प्रवाशांची गर्दी होत असल्याने अनेकांची गैरसोय होत होती. (New 15 coach local trains on Western Railway)

त्यामुळे आता पश्चिम रेल्वेने धीम्या मार्गावर लोकल ट्रेनची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. लोकल ट्रेनची संख्या वाढल्याने सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या काळात पश्चिम रेल्वेने कोट्यवधी रुपये खर्च करुन अनेक रेल्वे स्थानकांतील प्रलंबित कामे पूर्ण केली आहेत.

टीसीने पकडलेल्या इंजिनिअर तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

लोकल प्रवास बंद असल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक प्रवासी नोकऱ्या वाचवण्यासाठी बेकायदेशीरपण प्रवास करत आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोकलने विनापरवानगी प्रवास करताना पकडलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Kalyan Based Engineer Prem Surose travel Illegal From Mumbai Local to Save Jobs Video Viral)

प्रेम सुरोसे असे या तरुणाचे नाव असून त्याला परळ स्टेशनवर टीसीने पकडले होते. त्यानंतर त्याने याबाबतचा व्हिडीओ शूट करुन फेसबुकवर टाकला आणि तो चांगलाच व्हायरलही झाला. या व्हिडीओनंतर सरकारने सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, अन्यथा त्यांनी जगायचं तरी कसं? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकलमुळे हजारो जणांच्या नोकऱ्या गेल्या

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सरकारने सर्वसामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. यामुळे खाजगी नोकरदार वर्गाचे मात्र मोठे हाल होत आहेत. कारण आधीच तुटपुंजा पगार आणि दररोजचा रस्ते प्रवासाचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावं लागलं आहे. अशावेळी खासगी कंपन्यासुद्धा त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या नाहीत. जर कामावर आला नाहीत, तर नोकरी सोडावी लागेल, असं फर्मान सोडलं आहे. ज्यामुळे हजारो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या.

संबंधित बातम्या:

कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या मार्गिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

‘घरं नाही तर, मतं नाही’, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलिसांच्या कुटुंबियांचा एल्गार, मनसेचा जाहीर पाठिंबा

ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उभारणी प्रकल्पात कोणताही घोटाळा नाही; मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण

(New 15 coach local trains on Western Railway)