मुंबईतील ‘फॉर्च्युन हॉटेल’मध्ये भीषण आग, 30 ‘कोरोना वॉरिअर’ डॉक्टरांची सुटका

जेजे हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांची सोय मरिन लाईन्समधील 'फॉर्च्युन हॉटेल'मध्ये करण्यात आली होती (Mumbai Marine Lines Hotel Fortune Fire Doctors Saved)

मुंबईतील फॉर्च्युन हॉटेलमध्ये भीषण आग, 30 कोरोना वॉरिअर डॉक्टरांची सुटका
| Updated on: May 28, 2020 | 8:34 AM

मुंबई : मुंबईतील मरिन लाईन्सच्या परिसरात ‘फॉर्च्युन हॉटेल’मध्ये काल रात्री (27 मे) भीषण आग लागली होती. आगीतून 30 डॉक्टर थोडक्यात बचावले. हॉटेलमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. (Mumbai Marine Lines Hotel Fortune Fire Doctors Saved)

जेजे हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांच्या राहण्याची सोय मरिन लाईन्समधील धोबी तलावाजवळ असलेल्या ‘फॉर्च्युन हॉटेल’मध्ये करण्यात आली होती. या दुर्घटनेतून सर्व डॉक्टरांना सुखरुप वाचवण्यात आलं असून त्यांची व्यवस्था अन्यत्र करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. हॉटेलमध्ये अडकलेल्या 30 डॉक्टरांची सुटका करण्यात आली. आगीवर फायर ब्रिगेडकडून आगीच्या कूलिंगचे काम करण्यात येत होते.

हेही वाचा : अकोल्यातील मूर्तिजापुरात रेल्वे कार्यालयाला आग, निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड जळाले

रात्रीच्या वेळी फॉर्च्युन हॉटेलच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर आग लागली. ही आग वेगाने चौथ्या मजल्यापर्यंत पसरली. आगीमुळे काही काळ घबराट पसरली होती. धुरामुळे दृश्यमानताही कमी झाली होती. परंतु सर्वांची सुखरुप सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.