Monorail Service Disrupt : पावसाचा धुमाकूळ सुरु असताना मोनोरेल पुन्हा बिघडली, फायरब्रिगेडला बोलवावं लागलं

Monorail Service Disrupt : मुंबईत मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरु असताना मोनो रेलची सेवा विस्कळीत झाली आहे. मोनो रेल अचानक बंद पडली. यंदाच्या पावसाळ्यातील ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे फायर ब्रिगेडला बोलवावं लागलं.

Monorail Service Disrupt :  पावसाचा धुमाकूळ सुरु असताना मोनोरेल पुन्हा बिघडली, फायरब्रिगेडला बोलवावं लागलं
Mumbai Monorail
| Updated on: Sep 15, 2025 | 8:24 AM

मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यात आता मोनो रेलची सेवा विस्कळीत झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात मोनो रेल विस्कळीत होण्याची ही दुसरी वेळ आहे. वडाळा भागात मोनो रेल मध्येच बंद पडली. त्यामुळे फायर ब्रिगेडला बोलवावं लागलं. फायर ब्रिगेडच्या जवानांनी अडकलेल्या लोकांना सुरक्षितरित्या मोनोरेल मधून बाहेर काढल. ही मोनोरेल चेंबूरच्या दिशेने जात असताना मध्येच बंद पडली. मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढणं एक कठीण टास्क आहे. कारण मोनोरेलचा ट्रॅक जमिनीलगत नाहीय. तो काही फूट वरती एलिवेटेड आहे. अशावेळी प्रवाशांना रेस्क्यू करण्याची वेळ ओढवल्यास अग्निशमन दलाला पाचारण करावं लागतं. आज सकाळच्यावेळी वडाळा भागात मोनोरेल बंद पडली. सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांचे यामुळे हाल झाले.

आज पाऊस आहे. काल रात्रीपासून मुंबईत पावसाचा जोर आहे. त्यामुळे जे सखल भाग आहेत, तिथे पाणी साचण्याची शक्यता आहे. अशावेळी रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉपकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचल्यामुळे लोकांनी आज मोनो रेलचा पर्याय वापरल्याची शक्यता आहे. पण दुसऱ्यांदा मोनोरेल बंद पडली आहे. मागच्या महिन्यात 19 ऑगस्टला अशीच मोनोरेल बंद पडली होती. त्या दिवशी सुद्धा मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला होता.

काही तास प्रवासी आत अडकून पडलेले

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर सखल भागात पाणी साचतं. त्यामुळे 19 ऑगस्टला सुद्धा काही प्रवाशांनी मोनोचा पर्याय निवडला होता. पण संध्याकाळच्या सुमारास मोनो अचानक बंद पडली. त्यावेळी काही तास प्रवासी आत अडकून पडले होते. बराचवेळ मोनोरेल एकाचजागी थांबून होती. त्यामुळे आतमधले प्रवासी टेन्शनमध्ये आले. एसी आणि लाइट बंद असल्याने आपण गुदमरतोय असं लोकांना वाटू लागलं. आतामध्ये एकच गोंधळ, आरडाओरडा सुरु होता. काहींना चक्कर आली. काहींना गुदमरल्यासारखं झालं. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी काच फोडून प्रवाशांना बाहेर काढलं होतं. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने मोनोरेल बंद पडली असं कारण त्यावेळी देण्यात आलेलं.