मुंबई महापालिकेच्या आरक्षणाची लॉटरी फुटली… कुठला वॉर्ड कुणासाठी? तुम्हाला संधी आहे की नाही? पटापट चेक करा
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी वॉर्ड आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलली असून, ठाकरे गटातील तेजस्विनी घोसाळकर व मिलिंद वैद्य यांसारख्या दिग्गजांना धक्का बसला आहे.
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेच्या वॉर्डसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या आरक्षण सोडतीने अनेक प्रमुख राजकीय पक्षांच्या समीकरणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूण २२७ प्रभागांसाठी झालेल्या या सोडतीत अनेक दिग्गज विद्यमान आणि माजी नगरसेवकांच्या मतदारसंघांवर थेट परिणाम होणार आहे.
या आरक्षण सोडतीचा सर्वात मोठा फटका ठाकरे गटाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्विनी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक १ आता मागासवर्ग प्रवर्ग (OBC) म्हणून आरक्षित झाला आहे. तेजस्विनी घोसाळकर गेल्या काही दिवसांपासून या वॉर्डात निवडणुकीची तयारी करत होत्या. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मिलिंद वैद्य यांचा वॉर्ड क्रमांक १८२ हा आधी सर्वसाधारण गटात होता. तो आता ओबीसी (मागासवर्ग प्रवर्ग) म्हणून आरक्षित झाला आहे.
मुंबई महापालिकेत आरक्षण कसे असणार?
प्रवर्ग
एकूण जागा
महिलांसाठी राखीव जागा
सर्वसाधारण (खुला गट)
१४९
७४
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC)
६१
३१
अनुसूचित जाती (SC)
१५
८
अनुसूचित जमाती (ST)
२
१
एकूण
२२७
११४
अनुसूचित जाती (SC) करिता आरक्षित प्रभाग
क्र.
प्रभाग क्रमांक
आरक्षणाचा प्रवर्ग
१
१३३
SC महिला
२
१८३
SC महिला
३
१४७
SC महिला
४
१८६
SC महिला
५
१५५
SC महिला
६
११८
SC महिला
७
१५१
SC महिला
८
१८९
SC महिला
९
२६
SC सर्वसाधारण (खुला)
१०
९३
SC सर्वसाधारण (खुला)
११
१४६
SC सर्वसाधारण (खुला)
१२
१५२
SC सर्वसाधारण (खुला)
१३
२१५
SC सर्वसाधारण (खुला)
१४
१४१
SC सर्वसाधारण (खुला)
१५
१४०
SC सर्वसाधारण (खुला)
अनुसूचित जमाती (ST) करिता आरक्षित प्रभाग (एकूण २)
क्र.
प्रभाग क्रमांक
आरक्षणाचा प्रवर्ग
१
१२१
ST महिला
२
५३
ST सर्वसाधारण (खुला)
दरम्यान मुंबई महापालिकेच्या (BMC) आरक्षण सोडतीनुसार, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) साठी एकूण 61 जागा राखीव आहेत. यापैकी, 30 जागा OBC सर्वसाधारण/खुला प्रवर्गासाठी ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व प्रभागांची यादी खालीलप्रमाणे आहे. हे सर्व वॉर्ड OBC प्रवर्गातील पुरुष आणि महिला या दोन्ही उमेदवारांसाठी खुले (Open) असतील.