BMC Election 2022 (ward 61): या निवडणुकीतही शिवसेनेची प्रभाग क्र. 61 वर पकड राहणार का? सेना पुन्हा मुसंडी मारणार का?

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने या प्रभागात जोरदार मुसंडी मारली असली तरी आता राज्यातील आणि केंद्रातील राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने आताच्या निवडणुकीत 2017 चेच चित्र पुन्हा दिसणार की राज्यातील बदलेल्या राजकीय समीकरणाचं चित्र याही प्रभागात दिसणार ते आता निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होणार आहे.

BMC Election 2022 (ward 61): या निवडणुकीतही शिवसेनेची प्रभाग क्र. 61 वर पकड राहणार का? सेना पुन्हा मुसंडी मारणार का?
महादेव कांबळे

|

Jul 17, 2022 | 5:00 PM

मुंबईः मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 61 (MUMBAI MUNICIPALITY WARD NO. 61) निवडणुका झाल्यानंतर निकालावेळी प्रचंड चर्चेत आलेला मतदार संघ. या मतदार संघात बहुतांशी राजकीय पक्षाचे उमेदवार असले तरी शिवसेनेची (Shivsena) पकड मुंबईतील मतदार संघावर किती आणि कशी असते त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून प्रभाग क्र. 61 चे द्यावे लागेल. या प्रभागामध्ये अपक्षापासून भाजप, बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन समाज पार्टी, नॅशनललिस्ट काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन, समाजवादी पार्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशा प्रादेशिक पक्षांपासून ते राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व पक्षाचे उमेदवार या प्रभागामध्ये होते, मात्र या प्रभागावर पक्की पकड शिवेसेनेची असल्यानेच राजूल सुरेश पटेल (राजूल सुरेश पटेल) यांनी 10043 मत घेऊन शिवसेना पक्षाचा झेंडा या प्रभाग रोवला, तोही 5,766 मतांनी भाजपच्या उर्मिला रवीशंकर गुप्ता यांचा पराभव केला.

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने या प्रभागात जोरदार मुसंडी मारली असली तरी आता राज्यातील आणि केंद्रातील राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने आताच्या निवडणुकीत 2017 चेच चित्र पुन्हा दिसणार की राज्यातील बदलेल्या राजकीय समीकरणाचं चित्र याही प्रभागात दिसणार ते आता निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होणार आहे.

नशीब अजमविणारे उमेदवार

1चेरणाबाई हौसाजी भालेराव (अपक्ष) 28 2.प्रियंका जयप्रकाश गुप्ता ( अपक्ष) 273 3.उर्मिला रवीशंकर गुप्ता (भारतीय जनता पार्टी) 4277 4.आशा शिवाजी कांबळे ( बहुजन मुक्ती पार्टी) 38 5.भटाबाई एकनाथ कापडणे ( बहुजन समाज पार्टी) 477 6.रजीया मो. रशिद कुरेशी (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) 7.सत्वशिला उत्तम परब (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 491 8.पटेल राजुल सुरेश (शिवेसना) 10043 9.सईदा अब्दुल शेख (एआयएमआयएम) 2268 10.गायत्रीदेवी रामगोविंद सिंह ( समाजवादी पार्टी) 989 11.मनोरमा उमेश सिंह (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 2244

या मतदार संघात एकूण मते47093 असून त्यापैकी 21278 मतदारांनी मतदान करून शिवसेनेच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून दिले होते. त्यावेळची परिस्थिती वेगळी असली तरी आता मात्र या मतदार संघात शिवसेनेचे वर्चस्व राखण्यासाठी आणखी कष्ट घ्यावे लागणार एवढं मात्र नक्की.

वॉर्ड कुठून पासून कुठपर्यंत

मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 61 या विभागाची सीमा ही बीएमसी रोडच्या ( क्रीक रोड) नाक्यापासू बीएमसी रोडच्या (क्रीक रोड) पश्चिम बाजूने दक्षिणेकडे बँक रोड ओलांडून जानकीदेवी पब्लिक स्कूल रोडपर्यंत. तेथून जानकीदेवी पब्लिक स्कूल रोडच्या पश्चिम बाजूने दक्षिणकडे नाल्यापर्यंत. तेथून उक्त नाल्याच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे पुढे पश्मिच बाजूने दक्षिणेकडे जयप्रकाश रोडपर्यंत. तेथून जयप्रकाश रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे समुद्र किनाऱ्यापर्यंत. तेथून समुद्र किनाऱ्याच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे के पश्चिम व पी उत्तर विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत. तेथून उक्तसामाईक सीमेच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे के पश्चिम व पी दक्षिण विभागांच्या सामाईक सीमेपर्यंत. तेथून उक्त सामाईक सीमेच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे बीएमसी रोडपर्यंत म्हणजेच निघालेल्या ठिकाणापर्यंत. सदर प्रभागात वर्सोवा, साईनगर, वर्सोवा जेट्टी या प्रमुख ठिकाणी/वस्ती/नगरे यांचा समावेश होतो.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनापटेल राजुल सुरेश पटेल राजुल सुरेश
भाजपउर्मिला रवीशंकर गुप्ता
काँग्रेसमनोरमा उमेश सिंह
राष्ट्रवादीरजीया मो. रशिद कुरेशी
मनसेसत्वशिला उत्तम परब
इतर/अपक्ष

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें