Mumbai News : स्विमिंग पूलमध्ये अनाहूत पाहूणा, मगरीच्या छोट्या पिल्लामुळे उडाला गोंधळ

| Updated on: Oct 03, 2023 | 1:48 PM

या घटनेचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. मगरीचं हे छोटं पिल्लू तलावात सहज पोहताना त्यामध्ये दिसत आहे. मात्र या छोट्या पाहुण्यामुळे स्वीमिंगसाठी तेथे आलेल्या इतर लोकांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाल्याचे चित्र दिसत होते.

Mumbai News : स्विमिंग पूलमध्ये अनाहूत पाहूणा, मगरीच्या छोट्या पिल्लामुळे उडाला गोंधळ
Follow us on

दादर | 3 ऑक्टोबर 2023 : दादरच्या शिवाजी पार्क एरिआत असलेल्या महापालिकेच्या स्वीमिंग पूलमध्ये (swimming pool) सकाळी सकाळी बरीच गर्दी असते. अनेक मेंबर्स तिकडे नियमितपणे पोहोण्यासाठी येत असतात. मात्र त्याच स्विमिंग पूलमध्ये आलेल्या एक छोट्याशा अनाहूत पाहुण्यामुळे एकच घाबरगुंडी उडाली. पालिकेच्या महात्मा गांधी स्विमींग पूलमध्ये मगरीचं एक छोटं पिल्लू (baby crocodile) सापडल्याने गोंधळा उडाला. पहाटे साडेपाचच्या सुमारास हे २ फुटी पिल्लू तलावातील पाण्यात मजेत पोहत होतं. मात्र हे दृष्य पाहून बाकीचे सर्व चांगलेच घाबरले.

पालिका कर्मचारी तसेच वन्यजीव तज्ज्ञांच्या मदतीने त्या पिल्लाला पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. थोड्या वेळासाठी या पिल्लाला ड्रममध्ये ठेवण्यात आले. त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तसेच स्विमिंग पूलमध्ये मगरीचं हे पिल्लू नेमकं आलं कुठून याची रीतसर चौकशी करण्यात येणार आहे. आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक काळजी घेतली जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले .

सकाळच्या सुमारास हे मगरीचं हे पिल्लू स्वीमिंग पूलमधील पाण्यात इकडे-तिकडे मजेत फिरत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

नेमकं काय घडलं ?

याबाबत स्वीमिंग पूल आणि थिएटरचे को-ऑर्डिनेचर संदीप वैशंपायन यांनी अधिक माहिती गिली. हा स्वीमिंग पूल रोज सकाळी मेंबर्ससाठी खुला करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांकडून त्याची बारकाईने पाहणी केली जाते, तसेच सफाईही होते. नेहमीप्रमाणे आज पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास स्वीमिंग पूलची पाहणी केली असता, कर्मचाऱ्यांना पाण्यामध्ये मगरीचं एक छोटं पिल्लू आढळलं.

त्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने कारवाई करत या पिल्लाला सुखरूप पकडण्यात आले. हे पिल्लू वनविभागाच्या ताब्यात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान मगरीचे हे पिल्लू पकडताना स्विमिंग पूलची स्वच्छता करणारा एक कर्मचारी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात लगेच उपचार करण्यात आले व त्याची प्रकृती आता बरी असल्याची माहिती समोर आली आहे.