कुख्यात गँगस्टर अमित भोगलेला बेड्या, दोन देशी पिस्तूल, 8 जिवंत काडतुसे, शस्त्र जप्त, मुंबई पोलिसांची कारवाई!

| Updated on: Nov 29, 2021 | 6:25 PM

मुंबईः कुख्यात गँगस्टर अमित भोगलेला खुन्याच्या गुन्ह्यात अखेर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. भाजूपमधील सूरज मेहरा उर्फ सूरज नेपाळी याच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अमित भोगलेवर याआधी 3 खुनाचे गुन्हे आहेत तर एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. अमित भोगले हा तडीपार होता, त्यांच्याचर मोक्का,एमपीडीएसारखे गुन्हे दाखल आहेत. 3 ऑक्टोबरला केली […]

कुख्यात गँगस्टर अमित भोगलेला बेड्या, दोन देशी पिस्तूल, 8 जिवंत काडतुसे, शस्त्र जप्त, मुंबई पोलिसांची कारवाई!
कुख्यात गुंडाच्या अटकेत पोलिसांनी मोठा शस्त्रसाठाही जप्त केला.
Follow us on

मुंबईः कुख्यात गँगस्टर अमित भोगलेला खुन्याच्या गुन्ह्यात अखेर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. भाजूपमधील सूरज मेहरा उर्फ सूरज नेपाळी याच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अमित भोगलेवर याआधी 3 खुनाचे गुन्हे आहेत तर एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. अमित भोगले हा तडीपार होता, त्यांच्याचर मोक्का,एमपीडीएसारखे गुन्हे दाखल आहेत.

3 ऑक्टोबरला केली होती हत्या

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सूरज नेपाळी याने कारागृहातून बाहेर पडताच त्याचा अमित भोगलेसोबत वाद झाला होता. त्यावेळी सूरजने त्याला थेट एकट्याने भिडण्याची धमकी दिल्याचे समजते. याच रागातून भोगले याने सूरजची हत्या घडवून आणल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. 3 ऑक्टोबर रोजी ही हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आधी 8 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. या गुन्ह्यात भोगलेचा सहभाग स्पष्ट होताच गुन्हे शाखेने भोगलेला बेड्या ठोकल्या.

हत्यारांचा साठा जप्त

अमित भोगलेच्या अटकेनंतर त्याच्याकडून एक स्टेनलेस स्टीलचे ब्लेड, एक तलवार, स्टीलचा एक स्ट्रेस पीस, दोन देशी पिस्टल आणि 8 जिवंत काडतुसे, एक सफेद रंगांची ग्लोस्टर गाडी आणि दोन मोबाईल एवढं साहित्य जप्त करण्यात आलंय. जप्त केलेल्या या साहित्याची किंमत 43 लाख 800 रुपये इतकी आहे. डीसीपी निलोत्पल यांच्या मार्गदर्शनखाली ही मोठी कारवाई गुन्हे शाखेने केली आहे.

इतर बातम्या-

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात

विमानतळावर स्क्रिनिंग, जिनोम सिक्वेन्सिंग… ओमिक्रॉन रोखण्यासाठी ‘या’ गोष्टींवर भर देण्यास सुरू