200 लोकांचा पर्सनल डाटा विकणारे अटकेत, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

| Updated on: Feb 08, 2021 | 6:55 PM

कॉल डाटा आणि बँक खात्याची माहिती अवैधरित्या खरेदी आणि विक्री केल्या प्रकरणात गोरेगावमध्ये 2 जणांना अटक करण्यात आली आहे.

200 लोकांचा पर्सनल डाटा विकणारे अटकेत, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई
300 कोटी युजर्सचा पासवर्ड लिक
Follow us on

मुंबई : जवळपास 200 जणांचा कॉल डाटा आणि बँक खात्याची माहिती अवैधरित्या खरेदी आणि विक्री केल्या प्रकरणात गोरेगावमध्ये 2 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांतील एका अधिकाऱ्याने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत शैलेश मांजरेकर आणि राजेंद्र साऊ या दोघांना अटक केली गेली आहे. आरोपींकडून 6 मोबाईल फोन, जवळपास 200 जणांचा कॉल डाटा असलेला एक पेन ड्राईव्ह, सीडीआर प्रिंट आऊट, 3 लॅपटॉप, 1 आयपॅड आणि अन्य साहित्य जप्त केलं आहे.(Mumbai police arrest two accused for selling personal data of around 200 people)

नियमानुसार फक्त पोलिस आणि अन्य काही विभागांनाच लोकांच्या कॉल रेकॉर्ड्स मिळवण्याचे अधिकार आहेत. असं असताना हे 2 आरोपी लोकांचा कॉल डाटा खरेदी आणि विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला आरोपींकडून चालवण्यात येणाऱ्या गोरेगावमधील एका कंपनीची माहिती मिळाली. दरम्यान, आरोपींना असा दावा केला आहे की, ते खासगी डिटेक्टिव एजन्सी चालवतात.

मोठ्या टोळीचा पोलिसांना संशय

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी शनिवारी कंपनीतील कार्यालयाती तपासणी केली आणि 2 आरोपींना अटक केली. आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हरियाणातील एक व्यक्ती आणि दिल्लीतील एक महिला या दोघांना लोकांचा कॉल डाटा आणि अन्य माहिती देत होते. दरम्यान, पोलिसांनी एक टीम तपास करत आहे. अन्य 7 फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात अनेक आरोपींचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

डाटा विकून लाखोंची कमाई

तुम्हाल वाचून आश्चर्य वाटेल पण अशा डाटा खरेदी-विक्रीचा व्यवहारातून अनेक आरोपी लाखो रुपयांची कमाई करतात. हे आरोप अशा लोकांना तुमचा डाटा विकतात, जे या डाटाचा वापर करुन तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आपला खासगी डाटा देताना दहा वेळा विचार करा. तसंच तुम्ही तुमची खासगी माहिती देत आहात ती व्यक्ती योग्य आहे की नाही याची खात्री करा.

संबंधित बातम्या :

दोघांचं प्रेम होतं, त्यानं तिला पेटवलं, तिनं नंतर त्यालाच मिठी मारली.. पुढं जे घडलं त्यानं मुंबई हादरली !

नवी मुंबईत मर्सिडीजच्या धडकेत दोघा पोलिसपुत्रांचा मृत्यू, प्रसिद्ध हॉटेलियरचा मुलगा अटकेत

Mumbai police arrest two accused for selling personal data of around 200 people