AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत मर्सिडीजच्या धडकेत दोघा पोलिसपुत्रांचा मृत्यू, प्रसिद्ध हॉटेलियरचा मुलगा अटकेत

नवी मुंबईतील पामबीच रस्त्यावर अपघात करून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणी अटक केले. (Mercedes Car Hit and Run)

नवी मुंबईत मर्सिडीजच्या धडकेत दोघा पोलिसपुत्रांचा मृत्यू, प्रसिद्ध हॉटेलियरचा मुलगा अटकेत
नवी मुंबई हिट अँड रन
| Updated on: Feb 08, 2021 | 4:23 PM
Share

नवी मुंबई : नवी मुंबईत मर्सिडीज कारच्या धडकेत दोघा भावंडांच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रोहन अ‍ॅबोट हा प्रसिद्ध ॲबोट हॉटेलच्या मालकाचा मुलगा आहे. आरोपी रोहन अ‍ॅबोट चालवत असलेल्या मर्सिडीज कारच्या धडकेत पोलिसाच्या दोघा मुलांचा मृत्यू झाला होता. तर मर्सिडीज कार चालकाला फाशी देण्याची मागणी कटुंबीय करत आहेत. (Navi Mumbai Mercedes Car Hit and Run Hotelier Son Arrested)

नवी मुंबईतील पामबीच रस्त्यावर अपघात करून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणी ताब्यात घेतले. शनिवार रात्री दीड वाजता पामबीच मार्गावर दुचाकीला धडक देऊन आरोपी पळून गेला होता. रोहन अ‍ॅबॉर्ट (वय 32) याला पोलिसांनी अटक करुन कोर्टात हजर केले असता बेलापूर कोर्टातून आरोपीला जामीन मिळाला आहे. कारच्या धडकेत अक्षय गमरे आणि संकेत गमरे या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला होता. मयत तरुण मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याची मुलं आहेत.

बाईकने घरी येताना मर्सिडीजची धडक

रोहन हा वाशीतील अ‍ॅबॉर्ट हॉटेलच्या संचालकचा मुलगा असून त्याने मर्सडिज कारने दोघांना उडवले होते. या अपघातात अक्षय गमरे आणि संकेत गमरे या दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे भाऊ स्क्रीन प्रिंटिंगचे काम करून बेलापूर येथून तुर्भे सेक्टर 20 येथील राहत्या घरी दुचाकीने येत होते.

यावेळी एमएच 46 एबी 4023 क्रमांकाच्या भरधाव मर्सडिज कारने दोघांना धडक दिली. मुंबई एल टी मार्ग पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याची ही दोन्ही मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एकाचवेळी दोन्ही मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आरोपी कारचालकाला फाशी देण्याची मागणी

मुलांचा अपघात करण्याऱ्याला फाशीची द्या अशी मागणी मुलांच्या आईने केली आहे. तर दोन्ही मुले एकाच वेळी गेल्याने त्यांच्या आईला शोक अनावर झाला असून मला मोठा धक्का बसला आहे. मला अपंग करा, मला मरून जाऊ दे असे उद्गार मुलाच्या आईच्या तोंडून ऐकायला येत आहे.

संबंधित बातम्या 

Kusal Mendis | कारखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू, श्रीलंकन क्रिकेटपटू कुसल मेंडिसला अटक

(Navi Mumbai Mercedes Car Hit and Run Hotelier Son Arrested)

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.