मुंबई पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या, वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर झाडल्या गोळ्या

एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हर्ष म्हस्केने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मुंबई पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या, वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर झाडल्या गोळ्या
| Updated on: Jan 24, 2025 | 4:16 PM

गेल्या काही दिवसांपासून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता मुंबई पोलीस दलातील एका हवालदारच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्ष म्हस्के असे या मुलाचे नाव असून तो 20 वर्षांचा होता. हर्षने वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून जीवन संपवल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोअर परेल परिसरातील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलीस हवालदाराच्या मुलाने आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. हर्ष म्हस्के असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट

हर्षचे वडील पोलीस हवालदार संतोष म्हस्के हे SP युनिटमध्ये मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून काम करतात. संतोष म्हस्के यांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून हर्षने स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. संतोष म्हस्के हे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काही काळ बंदोबस्तासाठी त्यांच्या युनिटमध्ये तैनात होते, अशी माहिती समोर येत आहे. सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक हे त्यांच्या घरी पोहोचले आहे. ते या घटनेची माहिती घेत आहेत. मात्र २० वर्षीय हर्ष म्हस्केने आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हिंगोलीत राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन संपवले जीवन

दरम्यान काही दिवसांपूर्वी हिंगोलीत एका राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना होती. बुधवारी 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता ही घटना घडली. या घटनेमुळे राखीव दलात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या पथकांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या जवानाने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.