Mumbai Police | नाल्यात नवजात वाहून जाताना पाहून मांजरी ओरडल्या, मुंबई पोलिसांनी वाचवलं

मुंबईत (Mumbai) नवजात बाळाला (Newborn Baby) वाचवल्याची एक अनोखी घटना समोर आली आहे. मुंबईतील पंतनगर परिसरात एक नवजात अर्भक नाल्यात वाहून जात होते. पहिल्यांदा त्याला मांजरींनी पाहिले आणि त्यांनी आवाजाने आजूबाजूच्या लोकांना अलर्ट केले. यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली.

Mumbai Police | नाल्यात नवजात वाहून जाताना पाहून मांजरी ओरडल्या, मुंबई पोलिसांनी वाचवलं
Mumbai Police Rescued New Born
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 1:11 PM

मुंबई : मुंबईत (Mumbai) नवजात बाळाला (Newborn Baby) वाचवल्याची एक अनोखी घटना समोर आली आहे. मुंबईतील पंतनगर परिसरात एक नवजात अर्भक नाल्यात वाहून जात होते. पहिल्यांदा त्याला मांजरींनी पाहिले आणि त्यांनी आवाजाने आजूबाजूच्या लोकांना अलर्ट केले. यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळी पोहोचून नवजात अर्भकाला नाल्यातून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला.

मुंबई पोलिसांकडून ट्विट –

मुंबई पोलिसांनी ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे. “एक नवजात अर्भक कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकले गेले असल्याची माहिती पंतनगर निर्भया पथकाला एका हितचिंतकाकडून मिळाली होती. शेजारच्या मांजरींनी ओरडून गोंधळ केल्याने ती व्यक्ती सावध झाल्याचे समजले. बाळाला त्वरित राजावाडी रुग्णालयात नेले असून बाळ आता सुरक्षित आहे”, ट्विट मुंबई पोलिसांनी केले.

मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाने दक्षता दाखवत तात्काळ कारवाई केल्याने या निरागस बाळाचा जीव वाचला आहे. बाळाला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, आता नवजात अर्भक धोक्याबाहेर असून प्रकृतीत आहे. पोलिसांनी ट्विटमध्ये नवजात बालकाचा फोटोही शेअर केला आहे.

मात्र, मुलाच्या आई-वडिलांची किंवा त्याला नाल्यात सोडणाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या संदर्भात पोलीस तपास करत आहेत. पण, मुंबई पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचं आता सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

संबंधित बातम्या :

Child Rape: ठाण्यात 5 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, फरार आरोपींचा शोध सुरू

दागिने घ्यायच्या म्हणून आल्या, सोन्याच्या 90 नथी घेऊन पळाल्या, चोरीचा CCTV व्हिडीओ पाहाच

गाडीचा धक्का लागल्यावरुन वाद, उल्हासनगरात अल्पवयीन मुलाला तिघांनी भोसकलं