Mumbai Power Cut : ऊर्जामंत्री ग्राऊंड झिरोवर, टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे आज मुंबईतील टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी करणार आहेत. (Nitin Raut Visit Tata Power Trombay Thermal Plant)

Mumbai Power Cut : ऊर्जामंत्री ग्राऊंड झिरोवर, टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी
| Updated on: Nov 02, 2020 | 8:23 AM

मुंबई : टाटा वीज निर्मिती केंद्राने आयलँडिंगच्या काळात मुंबईला वीज पुरवठा केला नाही, अशी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे आज 2 नोव्हेंबरला मुंबईच्या ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी करणार आहेत. (Mumbai Power cut Nitin Raut Visit Tata Power Trombay Thermal Plant)

सकाळी 11 च्या सुमारास डॉ. नितीन राऊत हे टाटा वीज निर्णय केंद्रात दाखल होती. त्यानंतर ते आयलँडिंग यंत्रणेचे अद्यावतीकरण, भविष्यातील वाढीव वीज निर्मितीसाठी कंपनीचे नियोजन, स्काडा आणि नविनीकरण ऊर्जा यावर टाटा कंपनीतर्फे त्यांच्यासमोर सादरीकरण होईल. या ऊर्जा प्रकल्पाची ते प्रत्यक्ष पाहणी करतील. त्यानंतर या वीज निर्मिती केंद्रात दुपारी 2 वाजता त्यांची पत्रकार परिषद होईल.

टाटा वीज कंपनीच्या अंतर्गत असलेली मुंबईची आयलँडिंग यंत्रणा 12 ऑक्टोबरला मुंबईला बाहेरून येणारा वीजपुरवठा बाधित झाला होती. त्यानंतर आयलँडिंग यंत्रणा कार्यान्वित होणे गरजेचे होते. मात्र आयलँडिंग कार्यान्वित न झाल्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काही तास वीज खंडित होऊन मोठा फटका बसला.

या घटनेची गंभीर दखल घेत भविष्यात त्यादृष्टीने धोका टाळण्यासाठी नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळांना (ग्राऊंड झिरो) भेट देत आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी त्यांनी राज्य भार प्रेषण केंद्र आणि खारघर येथील महापारेषणचे केंद्र येथे प्रत्यक्ष भेट देऊन वीज ठप्प होण्यामागील कारणे समजून घेतली होती.

त्यानंतर आज डॉ. राऊत हे टाटा वीज कंपनीच्या टाटा थर्मल पाॅवर प्लांटला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. वीज पुरवठा ठप्प झाल्याबद्दल डॉ. नितीन राऊत हे संबंधित यंत्रणांचा वेळोवेळी आढावा घेत आहेत. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. (Mumbai Power cut Nitin Raut Visit Tata Power Trombay Thermal Plant)

संबंधित बातम्या : 

Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल