वाढीव वीजबिलावरोधात मनसे आक्रमक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रास्ता रोको

| Updated on: Aug 19, 2020 | 8:54 PM

कळंबोलीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे महामार्ग रोखून (Mumbai Pune Expressway Rasta roko movement MNS Angry On electricity bill) धरला.

वाढीव वीजबिलावरोधात मनसे आक्रमक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रास्ता रोको
Follow us on

कळंबोली : नवी मुंबईत मनसेने MSEB चे कार्यालय फोडल्याची घटना ताजी असतानाच कळंबोलीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे महामार्ग रोखून धरला. तब्बल अर्धा तास केलेल्या आंदोलनामुळे 2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागत मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. (Mumbai Pune Expressway Rasta roko movement MNS Angry On electricity bill)

कोरोना महामारीने एकीकडे सामान्य नागरिकांसमोर रोजगाराचा प्रश्न बिकट झाला आहे. तर दुसरीकडे नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाच्या पंचाईत आहेत. त्यातच वाढीव वीज बिल पाठवले जात होते. या विरोधात मनसेने आक्रमक होत एक्सप्रेस वे रोखून धरला होता.

पनवेल परिसरातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वाढीव विज बिले पाठवली जात होती. या वाढीव बिलाच्या निषेधार्थ मनसेने आक्रमक पावित्रा घेतला. मनसेने कळंबोली येथे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर जाणारी वाहतूक रोखत जोरदार घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अचानक पणे आंदोलन केल्याने पोलीस आणि प्रशासनाची तारांबळ उडाली होती. त्याचबरोबर जवळ पास एक तास हा महामार्ग रोखून धरल्यानंतर पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. (Mumbai Pune Expressway Rasta roko movement MNS Angry On electricity bill)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईतील दुकानदारांना दिलासा, दुकानं दररोज उघडण्यास आयुक्तांची परवानगी

राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 70 टक्क्यांवर, 4 लाखांपेक्षा जास्त बाधितांना डिस्चार्ज