
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालयानं यासंदर्भातील निर्णय यापूर्वी दिलेला होता. आता यासंदर्भातील विस्तृत आदेश जारी झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आपल्या विस्तृत आदेशात असं म्हटलं आहे कि राकेश वाधवान सोबत जमीन डील प्रकरणात जे आरोप आहेत ते वसईतले आहेत आणि वसई हे मुंबई सत्र न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत नाही. त्याचबरोबर पीएमसी बँक प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखे व्यतिरिक्त ईडी ही करत आहे आणि ईडीचे प्रकरण सदर न्यायालय हाताळत नाही.
अतिरिक्त सत्र न्यायधीश दीपक भागवत यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे. त्याचबरोबर न्यायालयाने आपल्या आदेशात असं ही म्हटलं आहे कि या प्रकरणात अजून कुठे गुन्हा दाखल नाही किंवा गुन्ह्याचा स्वरूप काय आहे. कुठल्या व्यवसायिक डीलच्या संदर्भात आरोप आहेत हे ही स्पष्ट नाही. त्यामुळे न्यायालय सरसकट संरक्षण देऊ शकत नाही. म्हणून कोर्टाने वरील निरीक्षण नोंदवत नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
विशेष म्हणजे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषद मध्ये नील सोमैया यांच्यावर पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान सोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. बाप बेटे दोनो जेल जायेंगे, असं संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊत यांच्या आरोप नंतर नील सोमय्या यांना आपल्या अटकेची भीती होती म्हणून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. अटक करण्याच्या स्थितीमध्ये त्यांना 72 तासा पूर्वी सूचना देण्यात यावी, अशी मागणी नील सोमय्या यांनी केली.
इतर बातम्या :
Russia Ukraine War : युक्रेन-रशिया पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर, युद्धावर तोडगा निघणार?