Mumbai Traffic: मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार; ट्रान्सपोर्ट हबचा मार्ग मोकळा; वाहनांसाठी होणार पार्किंगची व्यवस्था

दहिसर येथील पाच एकर जागेत अंडरग्राउंड पार्किंग आणि बहुमजली इमारती उभारण्यात येईल त्यामुळे या ठिकाणी कार्यालयासाठी जागा उपलब्ध होणार आहे यातून पालिकेला महसूल ही मिळणार आहेत शिवाय शॉपिंग सेंटर फूड कोर्ट अशा सुविधाही उपलब्ध झाल्याने नागरिकांसाठी सुविधा निर्माण होणार आहेत.

Mumbai Traffic: मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार; ट्रान्सपोर्ट हबचा मार्ग मोकळा; वाहनांसाठी होणार पार्किंगची व्यवस्था
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 9:03 AM

मुंबई: दिवसेंदिवस मुंबईत वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोडींचा (Traffic Jam) प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी ही एक मोठीच समस्या बनली आहे. वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी नेहमीच प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असले तरी ही समस्या निरंतर चालूच आहे. त्यामुळे मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून दहिसर जकात नाक्यावर (Dahisar Zakat Naka) उभारण्यात येणाऱ्या ट्रान्सपोर्ट हब (Transport hub) साठी सल्लागार नेमण्यात आला आहे. मुंबईत येणाऱ्या वाहनांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. एकूण 900 कोटींच्या या प्रकल्पात मोठ्या प्रवासी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे.

या ठिकाणावरुन प्रवाशांना मुंबईत जाण्यासाठी बेस्ट, मेट्रो, मोनो, रेल्वे, रिक्षा, टॅक्सी अशा वाहतुकीने जोडण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

पार्किंग आणि बिझनेस हब

केंद्राच्या धोरणामुळे 2017 पासून जकात कर पद्धती रद्द होऊन देशात एकच जीएसटी कर प्रणाली सुरू झाली आहे यामुळे मुंबईच्या सीमेवर असणारे पालिकेचे जकात नाके गेल्या पाच वर्षांपासून बंद आहेत त्यामुळे या जगात नाक्यावर पार्किंग आणि बिझनेस हब उभारावे अशी संकल्पना मांडण्यात आली होती.

दहिसर आणि मानखुर्द जकात नाक्यावर ट्रान्सपोर्ट हब

याबाबत कार्यवाहीसाठी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठक ही घेतली होती या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून पाचपैकी दहिसर आणि मानखुर्द अशा दोन जकात नाक्यावर ट्रान्सपोर्ट बिजनेस हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये मानखुर्द नाक्यासाठी सुमारे 300 कोटींचा खर्च केला जाणार आहे.

अंडरग्राउंड पार्किंग

दहिसर येथील पाच एकर जागेत अंडरग्राउंड पार्किंग आणि बहुमजली इमारती उभारण्यात येईल त्यामुळे या ठिकाणी कार्यालयासाठी जागा उपलब्ध होणार आहे यातून पालिकेला महसूल ही मिळणार आहेत शिवाय शॉपिंग सेंटर फूड कोर्ट अशा सुविधाही उपलब्ध झाल्याने नागरिकांसाठी सुविधा निर्माण होणार आहेत.

वाहतूक कोंडी फुटणार

मुंबईत इतर राज्य जिल्ह्यातून येणारे हजारो वाहने या ठिकाणी थांबवल्याने मुंबईत होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे वाहनांची संख्या कमी होणार असल्याने पर्यायाने वायू प्रदूषण कमी होण्याची मोठी मदत होणार आहे या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे इथे प्रवासी वाहने थांबविल्यानंतर मुंबई भरात जाण्यासाठी प्रवाशांना पर्यायी सुविधा मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.