निकालासाठी तारीख पे तारीख; मुंबई विद्यापीठाचा विधी शाखेचा निकाल रखडला; परदेशी शिक्षणाची संधी विद्यार्थी गमविणार?

| Updated on: Aug 12, 2022 | 10:33 AM

विधी शाखेच्या तृतीय वर्षे अभ्यासक्रमातील अंतिम सहाव्या सत्राच्या परीक्षा मेमध्ये होऊन तिसरा महिना सुरू झाला तरी अद्याप विधी शाखेचे अंतिम सत्राचे निकालाला जाहीर मुहूर्त मिळालेलाच नाही.

निकालासाठी तारीख पे तारीख; मुंबई विद्यापीठाचा विधी शाखेचा निकाल रखडला; परदेशी शिक्षणाची संधी विद्यार्थी गमविणार?
Follow us on

मुंबईः मुंबई विद्यापीठ (Mumbai University)नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते, कधी निकाल, कधी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तर कधी परीक्षा विभागाचा सावळा गोंधळ. आताही मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा (Examination Department) गलथान कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याचा फटका विधी शाखेच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना बसला आहे. मे महिन्यात मुंबई विद्यापीठाकडून विधी शाखेच्या तृतीय वर्ष (3rd Year of Law) विधी पदवीमधील अंतिम सहाव्या सत्राच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर सहाव्या सत्राच्या परीक्षा संपून तिसरा महिना सुरू झाला तरी अद्याप मुंबई विद्यापीठ विधी शाखेच्या सहाव्या सत्राचे निकाल जाहीर झालेले करण्यात आले नाहीत.

सहा जिल्ह्यात विधी महाविद्यालये

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा सहा जिल्ह्यांमधील विधी महाविद्यालये ही मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. विधी शाखेतील तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होत असतात.

निकाल पत्रक हातात नाही

त्याचबरोबर सर्वच विद्यार्थ्यांनी न्यायालयात वकिली सुरू करण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सप्टेंबर मध्ये होत असलेल्या परीक्षेला बसून त्यामध्ये उत्तीर्ण होऊन सनद मिळवणे क्रम प्राप्त असते. पुढील शिक्षणासाठी विदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता हे निकाल पत्रक हाती असणे गरजेचे असते.

निकालाला जाहीर मुहूर्त नाही

विधी शाखेच्या तृतीय वर्षे अभ्यासक्रमातील अंतिम सहाव्या सत्राच्या परीक्षा मेमध्ये होऊन तिसरा महिना सुरू झाला तरी अद्याप विधी शाखेचे अंतिम सत्राचे निकालाला जाहीर मुहूर्त मिळालेलाच नाही.

फक्त दिवस ढकलायचे

याबाबत प्रसार माध्यमांकडून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. विनोद पाटील यांच्याकडे वारंवार विचारणा केल्यानंतरही गेल्या पंधरा दिवसांपासून ते केवळ दोन दिवसात निकाल लागेल, तीन दिवसात निकाल लागेल, आज निकाल जाहीर होईल असे सांगत तारीख पे तारीख देत आहेत. यामुळे विधी शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.