Kirit Somaiya:मुंबईत वेगाने वाढतेय मुस्लिम लोकसंख्या… 5 वर्षांचे आकडे मांडत मुख्यमंत्र्यांकडे किरीट सोमय्या यांची मागणी काय?
Kirit Somaiya on Muslim Population: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील लोकसंख्या बदलावर चिंता व्यक्त केली आहे. हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या जन्मदरावरून त्यांनी मोठी मागणी केली आहे. याविषयीची आकडेवारीही त्यांनी सादर केली.

Kirit Somaiya on Muslim Population: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या जन्मदरावरून मोठा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी मुंबईतील लोकसंख्या बदलावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या लोकसंख्येतील बदलाच्या अभ्यासासाठी एक विशेष समिती गठीत करण्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार, मुंबईत हिंदू आणि मुस्लिम जन्मदराचे प्रमाण 3:2 असे आहे. त्यांनी काही आकडेवारीही सादर केली आहे. त्यानुसार मुंबईतील काही भागातील लोकसंख्येत बदल झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांनी मुस्लिम मुंबई होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांनी सध्याच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला. त्यांनी जन्मदराविषयी अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी सुद्धा राज्य सरकारकडे केली आहे.
2025 मधील आकडेवारी केली सादर
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वर्ष 2025 मधील मुलांच्या जन्माची आकडेवारी सादर केली. त्यानुसार, मुंबईत 70,380 हिंदू मुलं तर 48,554 मुस्लिम मुलं जन्माला आली. त्यांनी गेल्या पाच वर्षातील आकडेवारी सुद्धा सादर केली. पण या शासकीय आकडेवारीविषयी त्यांना आशंका आहे. या आकेडवारीनुसार,
वर्ष 2025: 70,380 हिंदू आणि 48,554 मुस्लिम मुलांचा जन्म झाला
गेल्या पाच वर्षातील आकडेवारी: 3,36,625 हिंदू आणि 2,20,754 मुस्लिम मुलांचा जन्म
जन्मदराचे प्रमाण काय: हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या जन्मदराचे प्रमाण 3:2
मुख्यमंत्री फडणवीसांकडे काय मागणी?
किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईतील या लोकसंख्येतील बदलाची आणि हिंदू-मुस्लिम प्रमाणाच्या आकडेवारीच्या अभ्यासासाठी एक विशेष समिती गठीत करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ही मुस्लिम मुंबई होण्याची शक्यता वर्तवली आहे. अभ्यासासाठी विशेष डेमोग्राफिक समिती नेमण्याची मागणी केली आहे. या सर्व जन्मदराचा अभ्यास करण्यात यावा. आकडेवारी तपासण्यात यावी. अधिकृत आकडेवारी समोर आणावी अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. त्यांनी मुस्लिम मुंबई करण्याचा डाव असल्याचा आरोपही केला.