मोदींनी मराठी भाषणात उल्लेख केलेली महाराष्ट्राची 11 रत्न कोण?

सचिन पाटील

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कल्याणमध्ये दोन मेट्रो प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या 90 हजार घरांच्या गृहप्रकल्पाचं उद्घाट झालं. ठाणे- भिवंडी-कल्याण आणि दहीसर-मिरा भाईंदर या दोन मेट्रो मार्गाचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल विद्यासागर राव हे उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी […]

मोदींनी मराठी भाषणात उल्लेख केलेली महाराष्ट्राची 11 रत्न कोण?

ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कल्याणमध्ये दोन मेट्रो प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या 90 हजार घरांच्या गृहप्रकल्पाचं उद्घाट झालं. ठाणे- भिवंडी-कल्याण आणि दहीसर-मिरा भाईंदर या दोन मेट्रो मार्गाचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल विद्यासागर राव हे उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.

मोदी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र भूमीला मी प्रणाम करतो. महाराष्ट्राच्या डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज या सुपुत्रांना मी वंदन करतो. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत अनेक महान संतांनी भक्तीमार्ग मजबूत करुन, लोकांना जोडण्याचं काम केले आहे. इथल्या पवित्र मातीने तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, अहिल्याबाई होळकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक रत्न दिले आहेत. महाराष्ट्राच्या या सर्व महान विभूतींना मी नमन करतो, प्रणाम करतो. ही आशा-अपेक्षांची भूमी आहे. स्वप्नं पूर्ण करणारी नगरी आहे. प्रत्येक क्षेत्रात देशाचे नाव उंच करण्याची भूमी आहे. आपणा सर्वांना माझा नमस्कार”

मोदींनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील या 11 रत्नांचा उल्लेख करुन त्यांना नमन केलं. मोदींनी मराठीतून भाषणाची सुरुवात करताच, उपस्थितांनी एकच जल्लोष केला. यावेळी मोदींनी मुंबई- ठाण्याने देशाला सामावून घेतल्याचं नमूद केलं.

कसे असतील ‘मेट्रो 5’ आणि ‘मेट्रो 9’ मार्ग?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेट्रो-5’ आणि ‘मेट्रो-9’ या दोन मेट्रो मार्गांचं भूमीपूजन केले.

मेट्रो-5 : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोचं काम एमएमआरडीएने 2022 पर्यंत पूर्ण करण्याचं ठरवलं आहे. 8 हजार 416 कोटी रुपये या मेट्रो मार्गासाठी लागणार आहेत. या मेट्रो मार्गावर एकूण 17 स्थानकं असतील. 24.9 किलोमीटर लांबीचा मेट्रो-5 चा मार्ग आहे.

मेट्रो-9 : दहिसर (पूर्व) ते मीरा भाईंदर मेट्रो मार्गावर एकूण 8 स्टेशन असतील. 2019 पर्यंत या मार्गाची सुरुवात केली जाणार आहे. 10.3 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असेल. 6 हजार 607 कोटी रुपयांचा खर्च मेट्र-9 बांधण्यासाठी येणार आहे.

संबंधित बातम्या 

मराठी माणूस कल्याण-डोंबिवलीकडे गेला, त्यांच्यासाठी ‘मेट्रो’ : मुख्यमंत्री 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI