मराठी माणूस कल्याण-डोंबिवलीकडे गेला, त्यांच्यासाठी 'मेट्रो' : मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईतील मराठी  माणूस ठाणे, डोंबिवली, कल्याण या भागाकडे आला आहे, त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहोत. मराठी माणसासाठी मेट्रो आणत होत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, ठाणे ते थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत मेट्रो सुरु करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. भिवंडीला कनेक्टिव्हिटी नव्हती, ती आता मेट्रोमुळे मिळेल. 10 किलोमीटरचा हा मार्ग 8 …

, मराठी माणूस कल्याण-डोंबिवलीकडे गेला, त्यांच्यासाठी ‘मेट्रो’ : मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईतील मराठी  माणूस ठाणे, डोंबिवली, कल्याण या भागाकडे आला आहे, त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहोत. मराठी माणसासाठी मेट्रो आणत होत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, ठाणे ते थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत मेट्रो सुरु करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

भिवंडीला कनेक्टिव्हिटी नव्हती, ती आता मेट्रोमुळे मिळेल. 10 किलोमीटरचा हा मार्ग 8 लाख लोकांना जोडणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गेल्या 70 वर्षात 70 लाख लोक प्रवास करतात, मात्र जे नेटवर्क गेल्या चार वर्षात झाले, त्याद्वारे एक कोटी लोकांना सुविधा मिळणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं

प्रधानमंत्री आवास योजनेतून सव्वा दोन लाख लोकांना घराच्या चाव्या दिल्या. लवकरच नऊ लाख लोकांना घरं देऊ. या प्रोजक्टमधून आम्ही सर्व घरं रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉपच्या बाजूला बनवू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली.

तसेच, “मोनो, मेट्रो, बस, रेल्वे हे सर्वांसाठी एक सिंगल तिकीट आपण आणणार आहोत. मोबाईलवरुन ट्रान्सपोर्टेशनची माहिती देणारं अॅप उपलब्ध करुन देणार असून, यामुळे ट्रान्सपोर्टवर जास्त लक्ष राहील.” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कसे असतील ‘मेट्रो 5’ आणि ‘मेट्रो 9’ मार्ग?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेट्रो-5’ आणि ‘मेट्रो-9’ या दोन मेट्रो मार्गांचं भूमीपूजन केले.

मेट्रो-5 : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोचं काम एमएमआरडीएने 2022 पर्यंत पूर्ण करण्याचं ठरवलं आहे. 8 हजार 416 कोटी रुपये या मेट्रो मार्गासाठी लागणार आहेत. या मेट्रो मार्गावर एकूण 17 स्थानकं असतील. 24.9 किलोमीटर लांबीचा मेट्रो-5 चा मार्ग आहे.

कोण-कोणते स्थानकं ‘मेट्रो-5’वर असतील?

 • कापूरवाडी
 • बाल्कुम नाका
 • काशेली
 • कालेर
 • पूर्ण
 • अंजुर फाटा
 • भिवंडी
 • गोपाल नगर
 • टेमघर
 • राजनौली गाव
 • गोवेगाव एमआयडीसी
 • कोणगाव
 • दुर्गादी फोर्ट
 • सहजानंद चौक
 • कल्याण रेल्वे स्टेशन
 • कल्याण एपीएमसी स्टेशन

मेट्रो-9 : दहिसर (पूर्व) ते मीरा भाईंदर मेट्रो मार्गावर एकूण 8 स्टेशन असतील. 2019 पर्यंत या मार्गाची सुरुवात केली जाणार आहे. 10.3 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असेल. 6 हजार 607 कोटी रुपयांचा खर्च मेट्र-9 बांधण्यासाठी येणार आहे.

कोण-कोणते स्थानकं ‘मेट्रो-9’वर असतील?

 • दहिसर (पूर्व)
 • पांडुरंग वाडी
 • अमर पॅलेस
 • जानकर कंपनी
 • साईबाबा नगर
 • दीपक हॉस्पिटल
 • शहीद भगतसिंह गार्जन
 • सुभाषचंद्र बोस स्टेडियम
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *