
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL ) म्हणजेच अटल सागरी सेतू २१.८ किलोमीटर लांब आहे. सहा लेनचा हा पूल १६.५ किलोमीटर समुद्रावर तर ५.५ किलोमीटर जमिनीवर आहे. देशातील सर्वात लांब असणारा या पुलाच्या निर्मितीसाठी १७ हजार ८४० कोटी रुपये खर्च आला आहे.

अटल सेतूचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. हा सेतू करताना एफिल टॉवरपेक्षा १७ पट जास्त लोखंड वापरले गेले आहे. कोलकातामधील हावडा ब्रिजपेक्षा चार पट जास्त लोखंडचा वापर केला आहे. पुलाच्या निर्मितीसाठी जे सिमेंट क्रॉक्रेट लागले ते अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा सहा पट जास्त आहे.

अटल सेतू इतका मजबूत आहे की त्यावर भूकंप, समुद्रांच्या लाटा, वादळ याचाही कोणताही परिणाम होणार नाही. या सेतूची निर्मिती एपॉक्सी-स्ट्रँड्स असणाऱ्या विशेष मटेरियलने केली आहे. या मटेरियलचा वापर अणूउर्जा प्रकल्पाच्या रियाक्टरासाठी केला जातो.

मुंबईते शिवडी हे अंतर ५२ किलोमीटर आहे. परंतु या सागरी सेतूमुळे हे अंतर फक्त २१.८ किलोमीटरवर आले आहे. रोज ७० हजार वाहने या पुलावरुन जाणार आहे. पुलावरुन ताशी १०० किमी वेगाने वाहने धावणार आहेतच. यामुळे मुंबई ते नवी मुंबी हा दोन तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांत होणार आहे.

अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. सुमारे ४०० कॅमेरे वाहनांवर नजर ठेवणार आहे. यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने काही सेकंदात कॅमेऱ्याच्या नजरेत कैद होणार आहे. या सागरी सेतूमुळे रायगडात माणूस अर्धा तासांत मुंबईत पोहोचणार आहे.