Ashok Kharat: ज्योतिषी अशोक खरात याचा देशाबाहेर पळून जाण्याचा प्लॅन, पण… त्याचा डाव असा पाडला हाणून, अटकेची इनसाईड स्टोरी

Ashok Kharat Arrest Inside Story: महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचे एक एक कारनामे समोर येत आहे. त्याच्यामागे मोठे राजकीय पाठबळ असल्यानेच अनेक महिलांच्या शोषणास, गुन्हेगारी कृत्य करण्यास तो धजावल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी कमालीची गुप्तता पाळली होती.

Ashok Kharat: ज्योतिषी अशोक खरात याचा देशाबाहेर पळून जाण्याचा प्लॅन, पण... त्याचा डाव असा पाडला हाणून, अटकेची इनसाईड स्टोरी
अशोक खरात, रुपाली चाकणकर
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 21, 2026 | 8:51 AM

Ashok Kharat Arrest Inside Story: नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचे एक एक कारनामे समोर येत आहे. राजकीय वरदहस्तामुळे त्याचे काळे कारनामे सुरू होते. अनेक महिलांचे लैंगिक शोषण त्याने केले. त्याचे 100 हून अधिक व्हिडिओ समोर आले आहेत. इतकेच नाही तर दमदाटी करून, धमक्या देऊन त्याने मोक्याच्या जमिनीही लाटल्या. त्याचे गोरखधंदे अजूनही बाहेर येत आहेत. तर या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट पडली आहे. त्यांनी काल पदाचा राजीनामा सोपवला. CMO कार्यालयाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे कळते. तर चेल्याकडूनच आपली विकेट पडण्याची भीती आणि पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता खरातलाही वाटत होती. त्यामुळे तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता होती असे तपासात पुढे आले आहे. पण त्याच्या सर्व मनसुब्यांवर पोलिसांनी असे पाणी फेरले.

परदेशी पळून जाण्याचा प्लॅन पाडला हाणून

नाशिक पोलिसांनी खास ऑपरेशन कॅप्टन खरात अटक राबवले. त्याच्या अटके वेळी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. पथकातील पोलीस अधिकाऱ्यांना देखील या अटकेची माहिती देण्यात आली नव्हती. त्याच्या घराजवळ जाईपर्यंत काही अधिकाऱ्यांना कोणाची अटक करायची याची माहिती नव्हती. कॅप्टन अशोक खरात याचे राजकीय संबंध बघता अटक करताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली.कॅप्टन खरात देशाबाहेर पळून जाण्याची पोलिसांना भीती होती. त्यामुळे अटक करण्याची कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवण्यात आली. या भोंदूला त्याच्या राहत्या बंगल्यातून रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळेसच आपल्या पापाचा घडा भरला याची जाणीव या बदमाशाला झाली.

अजून तक्रारी येण्याची शक्यता

खरात याचा ऑफिस बॉय नीरज जाधव याने महिलांसोबतच्या दृषकृत्याचे व्हिडिओ काढल्याचा संशय आहे. शिर्डीतील एका पीडितेला आणि खरात याला ब्लॅक करण्यासाठी त्याने एक व्हिडिओ लीक केला आणि या प्रकरणाचे बिंग फुटले. याप्रकरणी IPS तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे. SIT च्या पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील १२ वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कॅप्टन खरात प्रकरणात दाखल 3 गुन्ह्यांचा वेगाने तपास सुरू आहे. व्हिडीओतुन तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आले आहे. याप्रकरणात अटकसत्र आणि चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अजून तक्रारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us