शेअर बाजारात तोटा झाला अन् राष्ट्रीय खेळाडू बनला गुन्हेगार, लुटली सोनसाखळी

Mumbai Crime News | शेअर बाजारात झटपट पैसे कमवण्यासाठी एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूने गुंतवणूक सुरु केली. परंतु त्याला शेअर बाजारात १६ लाखांचा तोटा झाला. गुंतवणुकीसाठी त्याने हे पैसे लोकांकडून घेतले होते. कर्जाची परतफेड करण्यासाठी तो गुन्हेगार बनला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

शेअर बाजारात तोटा झाला अन् राष्ट्रीय खेळाडू बनला गुन्हेगार, लुटली सोनसाखळी
Aakash DhumalImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 10:53 AM

गोविंद ठाकूर, मुंबई, दि. 23 नोव्हेंबर | शेअर बाजारात गुंतवणुकीकडे अनेक जण आकर्षित होत आहे. परंतु कोणतीही खबरदारी आणि अभ्यास न करता केलेली गुंतवणूक तोट्याची ठरते. मुंबईतील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूसोबत असाच प्रकार घडला. त्याने शेअर बाजारात गुंतवणूक सुरु केली. त्यासाठी लोकांकडून कर्ज घेतले. परंतु शेअर बाजारात तोटा होऊ लागला. हा तोटा १६ लाखांपर्यंत गेला. मग पैसे मिळवण्यासाठी त्याची पावले गुन्हेगारीकडे वळली. मुंबईतील एका 60 वर्षीय महिलेची सोनसाखळी लुटल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. शेअर बाजारात झालेल्या नुकसानीमुळे ही चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. बेसबॉलमधील राष्ट्रीय खेळाडू आकाश धुमाळ याने हा प्रकार केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कर्जाची परतफेड करण्यासाठी गुन्हेगारीकडे वळला

गोरेगाव येथील प्रेसेज डिसिजा या 60 वर्षीय महिलेने भगुर नगर पोलीस ठाण्यात सोन्याची सोनसाखळी चोरीला गेल्याची तक्रार दिली. गोरेगावमधील इंदिरा नगर भागातून रविवारी दुपारी 12 वाजता 60 हजार रुपये किंमतीची त्यांची सोनसाखळी लांबवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात 25 वर्षीय आकाश धुमाळ याने हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले. तो बेसबॉलमधील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी हा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

शेअर बाजारात 16 लाखांचा तोटा

आकाश धुमाळ याची घरची परिस्थिती चांगली नाही. तो एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत आहे. झटपट पैसे कमवण्यासाठी त्याने शेअर बाजारात गुंतवणूक सुरु केली. त्यासाठी लोकांकडून पैसे घेतले. हे कर्ज 16 लाखांपर्यंत गेले. त्याला शेअर बाजारात तोटा झाला. लोक पैशांची मागणी करु लागले. त्यामुळे त्याने सोनसाखळी चोरी केली. तो गोरेगावमधील भगतसिंग नगर येथील रहिवासी आहे. पोलिसांना आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर त्यात आकाश धुमाळ दिसून आला. पोलिसांनी त्याच्या घरून त्याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Non Stop LIVE Update
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन..
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन...
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?.
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून...
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून....
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं..
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं...
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर.
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार.
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं.
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.