ललित पाटील यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, पुणे पोलिसांवर मोठी कारवाई

Pune lalit patil drug case | पुणे येथील ससून रुग्णालयातून फरार झालेला कैदी ललित पाटील याला अटक करण्यात आल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता ललित पाटील याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. पुणे पोलिसांनी यासंदर्भात गोपणीय अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

ललित पाटील यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, पुणे पोलिसांवर मोठी कारवाई
Lalit Patil
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 9:05 AM

प्रदीप कापसे, पुणे, दि. 21 नोव्हेंबर | अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपी आणि ड्रग्स माफिया ललित पाटील सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. ललित पाटील याची पोलीस कोठडी २० नोव्हेंबर रोजी संपली होती. त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलीस तपासातील महत्वाची माहिती न्यायालयात सादर करण्यात आली. यासंदर्भात गोपनीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. त्यात ललित पाटील याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासंदर्भात काही गोष्टी तपासातून समोर आल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली.

अकरा आरोपींवर मकोका

अमली पदार्थ तस्कार प्रकरणात आणखी चार नावे उघड झाली. त्यातील दोन आरोपी इम्रान शेख उर्फ अतिक अमीन खान आणि रहिश्चंद्र पंत यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांसह अकरा जणांवर मकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केली. मेफेड्रोन ड्रग्सची निर्मिती, ड्रग्सची साठवण, ड्रग्सचे वितरण ही माहिती तपासात उघड झाली आहे. त्यात प्रत्येकाचा सहभाग स्पष्ट झाला आहे. यानंतर ललित पाटील, अरविंद लोहरे, भूषण पाटील, जिशान शेख, राहुल पंडित, इम्रान शेख, शिवाजी शिंदे, हरिश पंत यांची पोलीस कोठडी २४ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. बचाव पक्षातर्फे आरोपींना पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तीवाद करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

दोषी पोलिसांवर बडतर्फ करण्याची कारवाई

ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन पोलिसांवर मोठी कारवाई केली आहे. नाथ काळे आणि अमित जाधव या दोघांना पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे. हे दोघे पोलीस ललित पाटील प्रकरणात चौकशीत दोषी आढळले आहे. यापूर्वी या दोघांना निलंबत करण्यात आले होते. मात्र आता थेट खात्यातून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सोमवारी हे आदेश काढले. नाथाराम काळे आणि अमित जाधव यांची कोर्ट कंपनी म्हणून ससून रुग्णालयात नेमणूक करण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या....
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?.
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट.
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?.
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ.
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्..
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्...
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली.
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम.
यंदा पवार कुटुंबाचे वेग-वेगळे पाडवे, दादांच्या बंडानंतर नात्यात फूट
यंदा पवार कुटुंबाचे वेग-वेगळे पाडवे, दादांच्या बंडानंतर नात्यात फूट.
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?.